• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 5, 2026
in इतर घडामोडी
0
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर – आजच्या लेखकांना, आजच्या लिहिणाऱ्यांना संयम नाही. लगेच मोठं व्हायचंय. लाईक्स आणि कमेंट्सवर जगणाऱ्या पिढीला मेंटॉर कसे मिळणार. जखमा संपल्या की निर्मिती संपली.. खडबडीत पाट्यावरच चांगलं वाटलं जातं. कलेच्या क्षेत्रात शिखर नसतंच.. सतत ती अस्वस्थता असली पाहिजेत. जखमा, दुःख आपल्या वाट्याला आली नसली तरी ती दत्तक घेता आली पाहिजे. असे प्रतिपादन प्राध्यापक, कवी, गीतकार व संवेदनशील लेखक प्रा. प्रविण दवणे यांनी केले. प्रिसिजन वाचन अभियानात प्रा. दवणे बोलत होते. चिरंजीव व कवी आदित्य दवणे यांनी प्रा. दवणे यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रारंभी प्रिसिजन फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी दवणे पितापुत्रांचे स्वागत केले.

प्रिसिजन वाचन अभियानात पहिल्यांदाच लेखक, कवी असलेल्या पुत्राने साहित्यिक व गीतकार असलेल्या आपल्या पित्याची मुलाखत घेतली. या पुतापुत्रातील संवादाने त्यांच्यातील साहित्यिक व कौटुंबिक बंध उलगडत गेले.

आजवर आपण अनेक संगितकारांकडे गीतलेखन केलं कोणता संगीतकार अधिक भावला, या आदित्यच्या प्रश्नावर दिलखुलास बोलताना प्रा. दवणे म्हणाले की, इंद्रधनुष्यातल्या कोणत्या रंगामुळे इंद्रधनुष्य खुलून दिसतं या प्रश्नासारखा हा प्रश्न आहे.. अजय-अतुलची चाल धबधब्यासारखं असते.. अनिल मोहिले म्हणजे प्रचंड मेहनत.. अशोक पत्कींची तरलता मला भावली. मनातली कविता पत्कींबरोबर लिहिता आली. खळ्यांच्या संगीतात जादू अशी की, तिथे गीतकाराचे शब्दांना छान जोजवले जाते. नंदू होनप यांच्यामुळे “निघालो घेऊन दत्ताची पालखी..” “अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली” यासारखी गीतं लिहू शकलो. पण टप्पोरं गाणं लिहिण्याचा खरा आनंद श्रीधर फडकेंकडे मिळाला.. कोरोना काळात तरी मी अडीचशेहून अधिक गीतं लिहिली.

गाण्यामध्ये कसं काव्य जपता यावर ते म्हणाले की, गाण्यामध्ये काव्य कसं जपता यापेक्षा कवितेने मला कसे जपले हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आरती प्रभू, ग्रेस यासारख्या कवींच्या उत्तम कविता संगीतकारांनी वेचल्या त्याची गाणी बनवली. माझ्यासारख्या गीतकारांना ते आव्हान असतं. काव्य आणि लोकप्रियता यांचा संगम म्हणजे उत्तम गाणं हे माझ्यासाठी साधं सूत्र आहे, असे प्रा. प्रविण दवणे यांनी सांगितले.

नव्याने लिहिणाऱ्या कवींना आज कुणी मार्गदर्शक नाही. मेंटॉर नाही.. साहित्यिकदृष्ट्या आमची पिढी अनाथ आहे…अशा परिस्थितीत त्यांनी काय करावं? या प्रश्नावर दवणे म्हणाले, “माणूसपणाची उत्कटता अनुभवता येईल अशी साहित्यिकांची पिढी आम्हाला मिळाली. राजकीय विखार आणि मूल्याचं अधःपतन इतकं झालंय की आज जमीनही लाजेल. सगळ्याच पातळीवर होणारं अधःपतन चिंताजनक आहे. त्यामुळे हे वैचारिक अनाथपण आलं. आज जगण्यातली, सृजनातली नैष्ठिकताच उरली नाही. आजच्या लिहिणाऱ्यांना संयम नाही. लगेच मोठं व्हायचंय. तुमची आतून आलेली कविता बाहेरून पुरस्कार मिळवणारी नसेल कदाचित पण ती जेंव्हा शब्दांतून व्यक्त होते तेंव्हा तोच पुरस्कार असतो.”

आयुष्यात आजवर भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तीमत्वांनी कसं प्रभावित केलं हेही त्यांनी सांगितलं. आई आणि वडिलांच्या स्वभावाचा, प्रोत्साहनाचा खूप मोठा परिणाम आपल्या घडण्यावर झाला असल्याचे प्रा. दवणे यांनी सांगितले.

प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी नितीन फलटणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले. सोलापुरातील वाचक, रसिक आणि साहित्यिकांची कार्यक्रमाला गर्दी केली होती.

Previous Post

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

Next Post

आषाढी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
आषाढी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी

आषाढी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026