• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीची पायाभरणी केली: प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2026
in इतर घडामोडी
0
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीची पायाभरणी केली: प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा
0
SHARES
3
VIEWS

महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यातील ‘कायक-दासोह’ या संकल्पनेवर सोलापूर विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळासोलापूर, दि. ३ – महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात ‘अनुभव मंटप’ स्थापन करून लोकशाही विचारांची प्रभावी पायाभरणी केली. “काय कवे कैलास” या ब्रीदवाक्यानुसार त्यांनी समता, बंधुता आणि मानवमूल्यांचा पुरस्कार केला. जातीभेद नष्ट करून समानतेची शिकवण देणारे महात्मा बसवेश्वरांचे विचार आजच्या समाजासाठीही तितकेच प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कन्नड विभाग, भाषा व वाङ्मय संकुल आणि महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यातील कायक-दासोह’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभ्यासक डॉ. बी. बी. पुजारी, डॉ. भीमाशंकर बिराजदार, डॉ. राजशेखर विजापुरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, भाषा व वाङ्मय संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. चंद्रकांत गार्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. अंजना लावंड यांनी स्वागत केले. महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. चंद्रकांत गार्डी यांनी कार्यशाळेची भूमिका मांडत प्रास्ताविक केले.प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी आपल्या भाषणात महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यातील सामाजिक, धार्मिक व नैतिक मूल्यांचे सखोल विश्लेषण केले.

कायक (श्रम) आणि दासोह (सेवा) या संकल्पनांमधून त्यांनी श्रमप्रतिष्ठा, सामाजिक न्याय व मानवी समतेचा संदेश दिला असून, तो संदेश आजच्या काळात अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यशाळेत डॉ. बी. बी. पुजारी, डॉ. भीमाशंकर बिराजदार व डॉ. राजशेखर विजापुरे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, वचन साहित्याचे तत्त्वज्ञान आणि त्याचे समकालीन सामाजिक संदर्भ यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित संशोधक, विद्यार्थी व अभ्यासकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.या कार्यक्रमास वित्त व लेखा अधिकारी सीए महादेव खराडे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. प्रशांत पवार, डॉ. वीरभद्र दंडे, प्राचार्य गजानन धरणे, ॲड. मल्लिनाथ शहाबादे, चन्नवीर बंकुर, राहुल पावले, महादेव न्हावकर, डॉ. राजीवकुमार मेंटे, डॉ. शिवानंद तडवळ यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ममता बोल्ली व श्रुती देवळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. गीता डिग्गे यांनी केले.फोटो ओळ :सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यातील कायक-दासोह’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. बी. बी. पुजारी, डॉ. भीमाशंकर बिराजदार, डॉ. राजशेखर विजापुरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, भाषा व वाङ्मय संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड व अन्य मान्यवर.

Previous Post

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीची पायाभरणी केली: प्रभारी कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

Next Post

जिल्हा कारागृहामध्ये प्रासादिक किर्तन सोहळा संपन्न

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
जिल्हा कारागृहामध्ये प्रासादिक किर्तन सोहळा संपन्न

जिल्हा कारागृहामध्ये प्रासादिक किर्तन सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026