• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवा- सिईओ दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2022
in इतर घडामोडी
0
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवा- सिईओ दिलीप स्वामी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर “ हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविणे साठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आॅनलाईन बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर , शिक्षणाधिकारी किरण लोहार, उप शिक्षणाधिकारी संजय जावीर उपस्थित होते

सिंीओ दिलीप स्वामी म्हणाले , जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वतंत्र संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय / निमशासकीय / खाजगी आस्थापना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करावयाची आहे. त्यानुसार सिईओ दिलीप स्वामी सर्व अधिकारी व ग्रामसेवक यांना सुचना दिल्या.

‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविणेबाबत तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी विविध स्तरातून सहकार्य मिळविणेसाठी शाळा, कॉलेजेस, एन.सी.सी., एन.एस.एस., स्वयंसहाय्यता समूह, युवामंडळ इ. मधून तिरंगा वॉलेंटियर्स नियुक्त करावेत. तसेच प्रसारमाध्यमे, संकेतस्थळ, भिंतीचित्रे, दवंडी इ. द्वारे सदर उपक्रमास प्रसिद्धी देण्यात यावी.
लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, अध्यक्ष उपाध्यक्ष,सभापती. उपसभापती, सदस्य, सरपंच/उपसरपंच, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, खेळाडू, माजी जि.प.सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, अधिकारी यांचेद्वारा नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानाबाबत आवाहन करण्यात यावे.

सदर उपक्रमांतर्गत गावातील वार्डनिहाय चार भाग करुन प्रत्येक एका भागाकरिता एक असे, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, सरपंच यांचेवर सोपविण्यात यावी.
प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामसभेकरिता पंचायत समिती स्तरावरुन एका अधिकारी/कर्मचारी यांची पर्यवेक्षणीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी.अशा सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी दिले.ग्रामपंचायत स्तरासाठी नोडल अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी (पंचायत) व शासकीय कार्यालये यांचेसाठी नोडल अधिकारी म्हणून सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती यांची नेमूणक करावी.

तालुकास्तरावरील हर घर तिरंग्याची आकडेवारी संकलित करुन जिल्हास्तरावर आकडेवारी कळविणेसाठी विस्तार अधिकारी (सांख्यिकी) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविणेसाठी खालीलप्रमाणे नियोजन करण्यात यावे.दिनांक 18.07.2022 रोजी तालुकास्तरावर व्यापारी असोसिएशन, सर्व संघटना, लायन्स क्लब, विद्यार्थी परिषद, रास्त भाव धान्य दुकान संघटना, मेडिकल असोसिएशन, एन.जी.ओ. यांची बैठक तहसिलदार व गट विकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात यावी. दिनांक 20.07.2022 रोजी ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा आयोजित करण्यात यावी.दिनांक 21.07.2022 रोजी ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्राम सभा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 7 (1) नुसार आयोजित करण्यात यावी. दिनांक 22.07.2022 रोजी सर्व शाळांमध्ये एक सभा तिरंग्यासाठी आयोजित करावी. सदर सभा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी.दिनांक 25.07.2022 रोजी ‘माझा तिरंगा माझा अभिमान’ या विषयावर सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात यावी. (इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचा एक गट, इयत्ता 9वी व 10 वी साठी एक गट व इयत्ता 11 वी व 12 वी साठी एक गट करावा.) सदर निबंध स्पर्धा घेण्याचे आयोजनाची जबाबदारी गट शिक्षणाधिकारी यांची राहील.’ हर घर तिरंगा’ हा जास्तीत जास्त घरावर कसा लागेल याचे नियोजन करावे.

ध्वजाचे पावित्र्य राखा
ध्वजसंहितेनुसार ध्वजाचे पावित्र्य राखण्यात यावे. ध्वजाचा अवमान होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेणेत यावी. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

Previous Post

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या वतीने बालगंधर्वांच्या स्मृतींना अभिवादन!

Next Post

नर्मदा नदीतून १३ मृतदेह बाहेर काढले, चार जण अमळनेरचे

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
नर्मदा नदीतून १३ मृतदेह बाहेर काढले, चार जण अमळनेरचे

नर्मदा नदीतून १३ मृतदेह बाहेर काढले, चार जण अमळनेरचे

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026