• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वर्षा आणि सागर बंगल्यावरील पाहुणचाराला चाप, टीकेची झोड उठल्यावर खानपानाच्या बजेटला कात्री

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2023
in मुख्य बातमी
0
वर्षा आणि सागर बंगल्यावरील पाहुणचाराला चाप, टीकेची झोड उठल्यावर खानपानाच्या बजेटला कात्री
0
SHARES
0
VIEWS

वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या खानपानाच्या वारेमाप खर्चावरील टीकेनंतर आता पाहुणचारावरील खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एवढेच नाही, तर वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी वर्षा व सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट दोन वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.
तसेच दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला पाच कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी कोणते पदार्थ मिळणार?
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पाहुण्यांसाठी साधारण व विशेष पदार्थांची यादी तयार करण्यात आली आहे.
साधारण पदार्थांच्या यादीत 44 पदार्थांचा समावेश आहे, तर विशेष पदार्थांच्या यादीत 29 पदार्थ आहेत.
साधारण पदार्थांमध्ये सर्वात स्वस्त पदार्थ वेफर्स असून त्यासाठी कंत्राटदारास फक्त 10 रुपये मिळणार आहेत.
विशेष पदार्थांमध्ये मसाला चहा, कॉफी व ग्रीन टी ही सर्वात स्वस्त असून त्यासाठी फक्त 14 रुपये, तर मसाला दुधासाठी 15 रुपये मोजावे लागणार आहेत.
विशेष पदार्थांमध्ये खाण्यासाठी कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक, स्पेशल पेढा हे सर्वात स्वस्त म्हणजे 15 रुपयांत दिले जाणारे पदार्थ असतील.
महत्त्वाची बाब म्हणजे साधारण व विशेष वर्गवारीत सर्वात महाग हे शाकाहारी व मांसाहारी बफेट आहेत.
साधारण पदार्थांमध्ये शाकाहारी बफेटसाठी 160 रुपये, तर मांसाहारी बफेटसाठी 175 रुपये आकारले जातील.
विशेष पदार्थांच्या यादीत स्पेशल शाकाहारी बफेट 325 रुपयांना, तर मांसाहारी बफेट 350 रुपयांत उपलब्ध करून दिला जाईल.
वारेमाप खर्चावर टीका
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील सरकारकडून होणाऱ्या वारेमाप खर्चावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील यंदाच्या अधिवेशनात चांगलच गाजलं होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चार महिन्याचे जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आले होते. यावर सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा खोचक सवालही अजित पवार यांनी केला होता. त्याला एकनाथ शिंदेंनी विधानसभेत प्रत्युत्तर देखील दिलो होते. कोरोना काळात बंगला बंद असताना किती खर्च झाले, याची माहिती घेतली का? असा सवाल शिंदे यांनी अजित पवार यांना केला. आमच्याकडे गेल्या आठ-नऊ महिन्यात राज्यभरातून सोन्यासारखी माणसे येत आहे. त्यांच्यासाठी चहापाणी करायचं नाही का? आपली ही संस्कृती नाही का?, असा सवाल त्यांनी केला होता.

Previous Post

येणकी येथील ग्रामदैवत जकराया महाराजांच्या यात्रेला प्रारंभ

Next Post

शेअर मार्केटमध्ये तीन दिवस शुकशुकाट राहणार; नेमकं कारण काय?

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
शेअर मार्केटमध्ये तीन दिवस शुकशुकाट राहणार; नेमकं कारण काय?

शेअर मार्केटमध्ये तीन दिवस शुकशुकाट राहणार; नेमकं कारण काय?

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026