• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 3, 2026
in इतर घडामोडी
0
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
0
SHARES
7
VIEWS

~ अडीच वर्षांत फ्लाय९१चा ६० हून अधिक विमानांचा ताफा; सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलरचा ऐतिहासिक करार

~१५,००० हून अधिक उड्डाणे पूर्ण; १२ शहरांसाठी दर आठवड्याला सुमारे २८० उड्डाणे, १३वे गंतव्यस्थान महिनाअखेरीस सुरू; ताफा विस्तारातून प्रादेशिक कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या फ्लाय९१च्या वचनबद्धतेला बळ

नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2026: भारताच्या प्रादेशिक विमान वाहतूक क्षेत्रातील ऐतिहासिक घडामोडीत, फ्लाय९१ ह्या प्रादेशिक विमान कंपनीने आज ४० एटीआर ७२-६०० विमानांची निश्चित ऑर्डर स्वाक्षरी केली. एटीआरला एखाद्या प्रादेशिक विमान कंपनीकडून मिळालेली ही जगातील सर्वात मोठी ऑर्डर असून, या करारामुळे भारतातील प्रादेशिक विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी ताफा विस्ताराला मोठी चालना मिळणार आहे.

सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याचा हा ऐतिहासिक करार भारताच्या प्रादेशिक विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, देशातील प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीला नवी दिशा देणारा गेमचेंजर ठरेल, अशी अपेक्षा आहे.

सेवा सुरू केल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांत गोवास्थित फ्लाय९१ने प्रादेशिक हवाई वाहतुकीत मजबूत स्थान निर्माण केले आहे. कंपनीने आतापर्यंत १५,००० हून अधिक उड्डाणे पूर्ण केली असून, सध्या १२ शहरांसाठी दर आठवड्याला सुमारे २८० उड्डाणे चालवली जातात. या महिन्याच्या अखेरीस १३वे गंतव्यस्थान सुरू होणार आहे. सध्या सहा एटीआर ७२-६०० विमानांचा ताफा असलेली फ्लाय९१ येत्या काही वर्षांत ६० हून अधिक विमानांपर्यंत विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ४० विमानांची ही ऐतिहासिक ऑर्डर देशातील सेवावंचित आणि हवाई संपर्क नसलेल्या शहरांना जोडण्यासाठी फ्लाय९१ची क्षमता आणखी वाढवणार आहे.

‘कनेक्टिंग भारत’ या संकल्पनेनुसार समर्पित प्रादेशिक विमान वाहतूक नेटवर्क उभारण्याच्या फ्लाय९१च्या महत्त्वाकांक्षेला या ऑर्डरमुळे निर्णायक बळ मिळणार आहे. भारत सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या उडान २.० या चौकटीद्वारे प्रादेशिक हवाई संपर्काला नव्याने चालना दिली जात असताना ही घोषणा करण्यात आली आहे.

या कराराच्या स्वाक्षरीचा समारंभ नवी दिल्लीतील उड्डाण भवन, नागरी विमान वाहतूक मंत्रालय येथे पार पडला. यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू, ATRच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नथाली टार्नॉड लॉड, ATRचे मुख्य व्यावसायिक अधिकारी अॅलेक्सिस व्हिडाल, FLY91चे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि CEO मनोज चाको, तसेच FLY91चे अध्यक्ष आणि Convergent Financeचे व्यवस्थापकीय भागीदार हर्ष राघवन, मंत्रालयातील अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ही ऑर्डर भारतातील एटीआरची उपस्थिती आणखी मजबूत करणारी ठरणार आहे. भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे. उच्च इंधन कार्यक्षमता, कमी उत्सर्जन आणि तुलनेने कमी धावपट्टीवरही प्रभावीपणे कार्य करण्याची क्षमता यामुळे एटीआर ७२-६०० हे भारतातील प्रादेशिक हवाई सेवांसाठी अत्यंत उपयुक्त विमान आहे.

“प्रादेशिक कनेक्टिव्हिटी हा भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासाचा मूलभूत आधार आहे. छोट्या शहरांना प्रमुख आर्थिक केंद्रांशी जोडणे हे राष्ट्रीय प्राधान्य आहे. उडान २.० अंतर्गत सरकारची ₹२८,८४० कोटींची गुंतवणूक प्रादेशिक हवाई संपर्काचा विस्तार करण्यासाठी आणि टियर-२ व टियर-३ शहरांना राष्ट्रीय आर्थिक प्रवाहाशी जोडण्यासाठी आमची दृढ वचनबद्धता दर्शवते. फ्लाय९१ची कामगिरी आणि ताफा विस्ताराची ही ऐतिहासिक बांधिलकी भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राबाबतचा वाढता विश्वास अधोरेखित करते. प्रादेशिक हवाई क्षमतेतील अशा मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीमुळे या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाईल.” असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू म्हणाले.

“भारताला उदयोन्मुख शहरांना थेट आणि कार्यक्षमपणे जोडणाऱ्या समर्पित प्रादेशिक विमान कंपनीची गरज आहे, या ठाम विश्वासातून फ्लाय९१ची निर्मिती झाली. आमच्या स्थापनेपासून आम्ही सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने वाढ केली आहे आणि ४० विमानांची ही ऑर्डर आमच्या पुढील टप्प्याचा पाया ठरणार आहे. अवघ्या अडीच वर्षांत १५,००० हून अधिक उड्डाणे चालवल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी आवश्यक कार्यानुभव आणि मजबूत पायाभूत क्षमता आम्ही निर्माण केली आहे. एटीआरच्या सहकार्याने आम्ही भारताला आवश्यक असलेले प्रादेशिक विमान वाहतूक नेटवर्क उभारत आहोत—जे नव्या संधी निर्माण करेल, स्थानिक अर्थव्यवस्थांना बळ देईल आणि खऱ्या अर्थाने ‘भारत अनबाउंड’च्या संकल्पनेला पुढे नेईल.”

फ्लाय९१च्या विस्तारासाठी एटीआरची निवड झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. हा विस्तार UDANच्या माध्यमातून प्रादेशिक कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या भारत सरकारच्या उद्दिष्टाशी सुसंगत असून, एटीआर ७२-६००च्या कार्यक्षमता व विश्वासार्हतेमुळे परवडणारी हवाई सेवा अधिक प्रवाशांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल,” असे एटीआरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नथाली टार्नॉड लॉड यांनी सांगितले.

“फ्लाय९१चे संस्थापक भागीदार आणि प्रमुख गुंतवणूकदार म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच दोन महत्त्वाच्या संधींच्या संगमावर विश्वास ठेवला आहे—भारताची विकासगाथा आणि प्रादेशिक विमान वाहतुकीची क्षमता. ४० विमानांची ही ऑर्डर फ्लाय९१साठी एक निर्णायक टप्पा असून, येत्या काळात आमच्या दृष्टिकोनाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देते. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी ही भारताच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आमचा विश्वास आहे. ती उदयोन्मुख आर्थिक केंद्रे, व्यवसाय आणि देशभरातील समुदायांना एकमेकांशी जोडण्याचे काम करेल,” हर्ष राघवन, अध्यक्ष, FLY91 आणि व्यवस्थापकीय भागीदार, Convergent Finance, म्हणाले.

Previous Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

Next Post

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

Related Posts

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
Next Post
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026
महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

November 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026