• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची नातेपुते, माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना भेटी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 5, 2022
in मुख्य बातमी
0
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची नातेपुते, माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना भेटी
0
SHARES
0
VIEWS

रुग्णांच्या आरोग्यसेवेसोबत स्वच्छतेला महत्व द्या – आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांच्या सूचना

सोलापूर : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद आरोग्य विभागाचे आहे. रुग्णालयामध्ये स्वच्छतेला महत्त्व द्या. कागदपत्रात न अडकता रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी आज नातेपुते येथे केले.

सावंत यांनी नातेपुते आणि माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार राम सातपुते, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, आता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव मोरे, नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नम्रता व्होरा, माळशिरसचे वैद्यकीय अधीक्षक मझहर काझी आदीसह अधिकारी कर्मचारी अधिकारी उपस्थितहोते.सावंत यांनी केस पेपर पद्धत, वैद्यकीय कक्ष, परिचारिका कक्ष, स्त्री आणि पुरुष रुग्ण कक्ष आणि त्यातील स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया विभाग याठिकाणी भेट देवून विविध सूचना केल्या.

रुग्णालय स्वच्छतेसाठी दोन कर्मचारी नेमा
प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक पातळीवर निविदा काढून दोन व्यक्ती स्वच्छतेसाठी नेमण्याचे निर्देश श्री सावंत यांनी दिले. त्या कर्मचाऱ्यांना दीडशे रुपयाऐवजी वाढवून पैसे द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना अग्निशमनचे प्रशिक्षण द्यावे
रुग्णालयात आगीचे प्रकार घडत आहेत, ग्रामीण रुग्णालयानी फायर ऑडिट करून घ्यावे. तज्ज्ञमार्फत अग्निशमनविषयी प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

रुग्णालयात ठिकठिकाणी फलक लावावेत
रुग्णालयात ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात. रुग्णांना कुठे काय आहे, याची माहिती समजण्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत ठिकठिकाणी कायमस्वरूपी सूचना फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ऍडमिट रुग्णांजवळ रोगनिदान कागद ठेवावा
रुग्णालयात रुग्ण ऍडमिट होतो. ऍडमिट झालेल्या ठिकाणी रुग्णाला काय आजार आहे, उपचार काय सुरु आहेत. याबाबत त्याच्या कॉटजवळ रोगनिदान कागद ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

रुग्णांची केली विचारपूस
नातेपुते आणि माळशिरस दोन्ही ठिकाणी श्री सावंत यांनी पुरुष आणि स्त्री रुग्ण कक्षाला भेट देवून रुग्णांची विचारपूस केली. काय मावशी…काय बाबा… आता बरं आहे का… कधी ऍडमिट झाला…. कोणी तपासलं… औषधे घेतली का… अशी चौकशी त्यांनी केली. यावर रुग्णांनी समाधानकारक उत्तर दिले.

कोविड लसीकरणावर भर द्या..
कोविडचा प्रादुर्भाव कमी वाटत असला अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. यामुळे कोरोना लसीकरण करून घ्यावे. काही नागरिकांनी पहिला डोस घेतला, मात्र दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही. अशा नागरिकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.सावंत यांनी ओपिडी रजिस्टर, औषध साठा, रुग्णांचा प्रकार याची प्रत्यक्ष माहिती घेऊन सूचना केल्या. औषधावरील तारीख स्वतः त्यांनी तपासून पाहून मुदतबाह्य औषधे न ठेवण्याच्या सूचना केल्या.

Previous Post

ठाकरे सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द

Next Post

उर्वशीने इंस्टाग्रामवर ग्रीन आउटफिटमधील फोटो पोस्ट केले आहेत

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
उर्वशीने इंस्टाग्रामवर ग्रीन आउटफिटमधील फोटो पोस्ट केले आहेत

उर्वशीने इंस्टाग्रामवर ग्रीन आउटफिटमधील फोटो पोस्ट केले आहेत

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026