• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकशाही दिनात सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी उपस्थित राहावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
November 6, 2023
in इतर घडामोडी
0
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शासकीय विभागांनी पुराव्याची तपासणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
1
VIEWS


सोलापूर, दिनांक 6 ( जिमाका):- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जावर संबंधित विभागाच्या प्रमुखांनी किंवा सक्षम प्राधिकारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उत्तर देणे अपेक्षित आहे. संबंधित तक्रारदाराला योग्य उत्तर मिळाल्यानंतर तो पुन्हा पुन्हा लोकशाही दिनात येणार नाही. तरी यापुढील काळात सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी स्वतः उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चर्चा करताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका वीणा पवार यांच्यासह अन्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय लोकशाही दिनात सर्वसामान्य नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचा निपटारा होणे अत्यंत आवश्यक आहे, त्यादृष्टीने सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी. ज्या विभागाचे अधिकारी लोकशाही दिनात उपस्थित नाहीत. त्या अधिकाऱ्यांना उद्या पुन्हा बोलावून घ्यावे व संबंधित विभागाच्या तक्रारीचा त्यांच्याकडून निपटारा करून घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकापेक्षा अधिक वेळा आलेल्या तक्रार अर्जांची विभाग निहाय पडताळणी करावी. प्रलंबित असलेले सर्व अर्ज पुढील पंधरा दिवसात निकाली निघावेत. व या पुढील काळात कोणताही तक्रार अर्ज तात्काळ निकाली निघण्यासाठी संबंधित विभागांनी योग्य नियोजन करावे. त्याप्रमाणेच पालकमंत्री कक्ष व मुख्यमंत्री कक्ष यांच्याकडे प्राप्त झालेल्या संबंधित विभागाच्या तक्रारी कक्षामार्फत तात्काळ संबंधित विभागाकडे पाठवल्या जातात, त्यावरही अत्यंत गतीने कार्यवाही करून तक्रार अर्जाचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.

लोकशाही दिन तक्रारी-
आजच्या जिल्ह्यस्तरीय लोकशाही दिनात 25 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील बहुतांश तक्रारी या जुन्याच होत्या. पुढील विभागाच्या तक्रारी झाल्या प्राप्त… भूमी अभिलेख, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, महसूल, भविष्य निर्वाह निधी, जिल्हा उपनिबंधक, कामगार विभाग, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, महावितरण, ऑफिसर्स क्लब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंढरपूर नगरपरिषद, प्रदूषण महामंडळ, भूसंपादन, पाटबंधारे विभाग, पोलीस विभाग, आरटीओ व जिल्हा जात पडताळणी समिती आदीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी माहिती अधिकार पालकमंत्री कक्ष व मुख्यमंत्री कक्ष या अनुषंगाने संबंधित विभागाचा आढावा घेऊन प्रत्येक विभागाकडे प्रलंबित असलेल्या अर्जावर त्वरित कार्यवाही करून सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून त्याची माहिती प्रशासनाला सादर करावी अशा सूचना दिल्या.

Tags: Collector Kumar AshirwadDemocracy Daygovernment agencies
Previous Post

दि.5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजनवन विभागाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

अनुभव प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने दिवाळी फराळ वाटप

Related Posts

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
Next Post
अनुभव प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने दिवाळी फराळ वाटप

अनुभव प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने दिवाळी फराळ वाटप

ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026