तरुणांनी मोबाईल पेक्षा व्यायामाचे व्यसन लावून घ्यावे – डॉक्टर अभिजीत वाघचौरे.

0
64

येस न्यूज मराठी नेटवर्क:-. प्रत्येकाला आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीचे वेड किंवा व्यसन असते ते असायलाच पाहिजे मात्र ते आपले आरोग्य बिघडवणारे नाही तर आयुष्य घडवणारे असेल याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तरुण पिढीने मोबाइलच्या किंवा मावा गुटखा याच्या आहारी न जाता नियमित व्यायामाचे व्यसन लावून घ्यावे. व्यायामामुळे आपले शरीर तर तंदुरुस्त राहील सोबत काम करण्याची क्षमता देखील वाढेल त्याचा फायदा उद्योग व्यवसायात होईल आणि मन प्रसन्न राहिल्याने कुटुंब परिवारातही चांगले वातावरण राहील असे प्रतिपादन आयर्न मॅन व सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अभिजीत वाघचौरे यांनी केले.

बीबीदारफळ येथील श्रीधर ननवरे यांनी सुरू केलेल्या “श्रीदत्त” फिटनेस जिम व वेलनेस सेंटर चे उद्घाटन डॉक्टर अभिजीत वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांना व्यायमाविषयी मार्गदर्शन केले . सोलापुरातील पहिले आयर्न मॅन व कॉम्रेड रन पूर्ण करणारे रनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर अभिजीत वाकचौरे यांचा परिचय डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी करून दिला. तसेच ग्रामीण भागामध्ये अत्याधुनिक साहित्याने परिपूर्ण अशी जिम सुरू केल्याने गावातील तरुणांना विशेषतः जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना याचा चांगला फायदा होईल असे प्रतिपादन डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बीबीदारफळ येथील लोकनेते श्री शिवाजी आण्णा पाटील, पत्रकार अरुण भाऊ बारस्कर, अखिल भारतीय छावा संघटनेचे तुषार दादा साठे, ह. भ. प. तुकाराम काका साठे, व बीबीदारफळ येथील ग्रामस्थ विशेषता तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिम चालक श्रीधर ननवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.