भोसे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र ‘आरोग्यवर्धिनी’ इमारत रामभरोसे; कामेही रखडली रुग्णांचे हाल; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

0
63

सांगली ( सुधीर गोखले) – मिरज तालुक्यातील मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असेलेले भासे हे छोटे गाव महामार्गालगतच गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे पण गेल्या काही महिन्यांपासून या इमारतीची दुरुस्ती सुरु आहे सध्या पावसाळा असल्याने या इमारतीच्या छतामधून गळतीचे प्रमाणही वाढले आहे तशातच येथील रुग्णांना आता मिरज सांगलीकडे उपचाराला पाठवण्याची नामुष्की येत आहे. सुमारे ५५ लाख रुपये खर्चून ‘आरोग्यवर्धिनी केंद्रातील मुख्य इमारतीची दुरुस्ती सुरु आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासामध्ये रुग्णांची देखभाल सुरु आहे. इमारतीच्या दुरुस्ती मुळे रुग्ण तापासणी जुन्या इमारती मधेच केली जात आहे. निवासी इमारती या विनापरवाना असल्याची बाब समोर येत आहे त्यातच या इमारती मध्ये छता चे कॉक्रीट कोसळत असल्याने मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे रुग्णांना छत्री घेऊनच आरोग्यकेंद्रात जावे लागत आहे. त्यात पुरेशा जागे अभावी महिलांना प्रसूती साठी मिरज किंवा सांगलीला पाठवले जात आहे या इमारती मध्ये दाखल करता येऊ शकत नाहीये.

अशा प्रतिकूल परिस्थिती मध्ये डॉकटर आणि इतर कर्मचाऱ्यांना रुग्णांवर उपचार करणे जिकिरीचे झाले आहे. डोक्यावर छत कधी कोसळेल याचा नेम नाही अशी अवस्था आहे. त्यातच येथील औषध साठा आणि उपकरणे पावसापासून जपून ठेवण्याचे एकप्रकारचे आव्हानच येथील कर्मचाऱ्यांवर आहे. आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीमधील काही खोल्या अद्याप अपूर्ण आहेत मात्र कामे संथगतीने सुरु आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या समोर तालुक्यातील न्हवे तर  जिल्ह्यातील अशाप्रकारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे एक प्रकारचे आव्हानच आहे जिथे सर्व सोई सुविधा नाहीत तिथे त्या पुरवाव्या लागतील आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये समन्वय साधून हि कामे करता येतील.