आषाढी एकादशीच्या निमित्ताने दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची पारंपरिक बाल दिंडी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवित पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात पारंपरिक गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
यावेळी मुख्याध्यापिका मनीषा पाटील तसेच पर्यवेक्षिका सुनीता गवळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेची ओळख आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

















