सरगम स्टुडिओ सोलापूर प्रस्तूत यादोंकी महफिल…

0
38

सोलापूर: स्व. मोहम्म्मद रफि साहेब यांच्या ४३ व्या पुण्यतिथी निमित्त ऑर्केस्ट्रा च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे. कार्यक्रमास मोहम्मद रफि आणि मोहम्मद अय्याज यांचे सदाबहार गित सादर करण्यात येणार आहे. आणि या कार्यक्रमाचे सयोंजन आरिफ एलाल आणि मॅनेजमेंट कासिम शेख यांनी केले आहे.सदर कार्यक्रमात गायक आरिफ एलाल, कासिम शेख, इम्रान राज, मुस्तकिम एलाल आणि गायिका म्हणून अनिता अय्यर, आम्रपाली लोखंडे हे कलाकार सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला (प्रवेश विना मुल्य) राहील.

विथ ऑर्केस्ट्रा स्ट्रा स्टास आफ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. नरसय्या आडम मास्तर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन यांच्या शुभहस्ते होणार आहे. हा कार्यक्रम रविवार रोजी रात्री ८.३० वाजता हुतात्मा स्मूर्ती मंदीर येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व रसिकांची उपस्थीती राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे , यावेळी अरीफ जलाल, कासीम शेख, इम्रान राज, अनिता अय्यर, आम्रपाली लोखंडे, आमीर हुंडेकरी, आदी मान्यवर उपस्थित होते..