वाहनांची फिटनेस तपासणी अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा वापरून केली जाणार आहे.यासाठी सोलापूर आरटीओ कार्यालयात अत्याधुनिक मशीन दाखल झाली आहे. या मशीनरीचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता फिटनेस प्रमाणपत्र देताना होणारा मानवी हस्तक्षेप कमी होईल. अधिक पारदर्शकता वाढवणे आणि चिरीमिरीला आळा घालणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. लवकरच ही सुविधा वाहकधारकांसाठी उपलब्ध होणार आहे. या फिटनेस मशीनमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे. रस्त्यावर एकदम फिट वाहने फिरताना दिसतील असे प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी सांगितले.

