• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नाशिकच्या द्वारका पुलावर भीषण अपघात ;सहा जणांचा मृत्यू…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2025
in इतर घडामोडी
0
नाशिकच्या द्वारका पुलावर भीषण अपघात ;सहा जणांचा मृत्यू…
0
SHARES
0
VIEWS

नाशिक: नाशिकच्या द्वारका पुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत आणि जखमींमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. द्वारका पुलावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये एका टेम्पोने लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकली. या ट्रकमधील लोखंडी सळ्या अंगातून आरपार गेल्याने सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे द्वारका उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या परिसरात तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी द्वारका उड्डाणपुलावर एक टेम्पो मागून ट्रकला जोरात धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ट्रकच्या मागच्या बाजूला पोरसवदा मुलांचा एक ग्रूप होता. अपघातानंतर लोखंडी ट्रकमधील सळया यापैकी काहीजणांच्या अंगात शिरल्या. या सगळ्यांच्या शरीरातून बराच रक्तस्राव झाला. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते, चेतन पवार यांचा समावेश आहे. तर राहुल राठोडे (वय 20), लोकेश निकम (वय 18), अरमान खान (वय 15), ओम काळे, अक्षय गुंजाळ, राहुल साबळे हे सर्वजण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पोलिसांकडून बराचवेळ वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु होते. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, भद्रकाली पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरु करुन जखमींना रुग्णालयात पाठवले.

Previous Post

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेची डिल ; सह्याद्री अतिथीगृहावर नोटा मोजतानाचे फोटो समोर आले…

Next Post

प्रिसिजनला “सेफ्टी एक्सलन्ससाठी प्लॅटिनम आणि गोल्ड पुरस्कार”

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
प्रिसिजनला “सेफ्टी एक्सलन्ससाठी प्लॅटिनम आणि गोल्ड पुरस्कार”

प्रिसिजनला "सेफ्टी एक्सलन्ससाठी प्लॅटिनम आणि गोल्ड पुरस्कार"

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026