• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू – सुशीलकुमार शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
June 30, 2025
in इतर घडामोडी
0
कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू – सुशीलकुमार शिंदे
0
SHARES
0
VIEWS

ढोर समाज देशव्यापी मेळाव्यात नवे शिक्षण धोरण, आरक्षण वर्गीकरणावर चर्चा
सोलापूर, (प्रतिनिधी)ः- मागासवर्गीय गटात ढोर समाज संख्येने कमी असला तरी आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करून कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ढोर समाजाच्या देशव्यापी मेळावा रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धर्माजी सोनकवडे, गुरूमाता, राजेश खंदारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

समाजाचा विकास करायचा असेल तर मी समाजासाठी काय योगदान दिले आहे याचे आत्मचिंतन करून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. पुर्वीच्या लोकांनी काय केले त्यापेक्षा यापुढे काय करायचे आहे यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आपला समाज लोकशाही मानणारा आहे. आम्ही मूठभर असलो तरी सुशिक्षित आहोत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात संघर्ष केला पाहिजे तरच यश प्राप्त होते कोणत्याही कामाला लाज वाटू देवू नका असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. आरक्षण वर्गीकरणामुळे समाजावर काय परिणाम होणार आहे हे पुढील काळात समजेल परंतु आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगले शिक्षण देवून सक्षम केले पाहिजे असेही शिंदे यांनी सांगितले.

प्रत्येकाला जातीचा अभिमान असला पाहिजे आणि प्रत्येकाने समाजासाठी काम केले पाहिजे समाजातील मुलींना चांगले शिक्षण दिले पाहिजे असे आपल्या मनोगतामधून माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांनी व्यक्त केले.

समाजाच्या विकासासाठी मी कायम सोबत राहणार आहे अनेक अडचणी आहेत आरक्षणामध्ये इतर जाती घुसल्यामुळे आपल्या समाजावर अन्याय होत आहे संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी प्रत्येकाने तयारी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.

प्रारंभी या मेळाव्याचे संयोजक लक्ष्मीदास सोनकवडे यांनी प्रास्ताविक करीत समाजात अंतर्गत जनगणना केली तर आपण किती आहोत याची संख्या कळेल त्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे सर्वांनी सहकार्य करावे. समाजातील सक्षम असलेल्यांनी मागे राहिलेल्या समाजबांधवाना मदतीचा हाथ दिला पाहीजे ज्यांच्याकडे आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही अशा लोकांना मदत केली तर समाज सुधारणा व्हायला वेळ लागणार नाही असे त्यांनी सांगितले. दिपप्रज्वलन आणि संत कक्कय्या, शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी राज्यातून आलेल्या अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर देशभरात समाजाचे नावलौकीक वाढवणार्‍या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रविण होटकर आणि वनिता होटकर यांनी केले तर आभार सटवाजी होटकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सुधीर खरटकमल, मुन्ना कटके, सच्चिदानंद होटकर, अशोक सदाफुले, रविंद्र शिंदे, संगीता जोगधनकर, शारदा शिंदे, अ‍ॅड विद्या कटकधोंड, राजेश कटकधोंड,विनोद होटकर,नित्यानंद सोनकवडे, विनायक होटकर, गणेश शिंदे यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले. दिवसभर हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या या मेळाव्यासाठी ढोर समाजबांधवांनी मोठ्यासंख्येने गर्दी केली होती.

Previous Post

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असणार ‘फूट मसाजर’

Next Post

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026