• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Yes News Marathi by Yes News Marathi
October 10, 2026
in Blog
0
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
0
SHARES
0
VIEWS

माढा-पंढरपूर तालुक्यात ऊस वाहतूक रोखली; भीमानगर येथे बारामती ॲग्रो कारखान्याच्या कार्यालयाला ठोकले टाळे

सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन पेटणार; ऊसतोड बंद करून वाहतूक करणारी वाहने रोखली

भीमानगर- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामातील उसाचा दर जाहीर न करताच साखर कारखान्यांकडून ऊसतोड सुरू करण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. माढा आणि पंढरपूर तालुक्यांत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखून धरली. तसेच भीमानगर येथे रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकून ऊस दर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

एकीकडे ऊस उत्पादक शेतकरी उत्पादन खर्चाच्या वाढत्या ओझ्याखाली दबला असताना दुसरीकडे कारखानदारांनी उसाचा दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकदा शेतातील ऊस कारखान्यात गेल्यानंतर कारखानदार ठरवतील तो दर स्वीकारण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

ऊस दर जाहीर करा, अन्यथा ऊसतोड करू देणार नाही

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि उसाचा दर स्पष्ट न करता कारखाने सुरू करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे ऊसाचा योग्य दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड आणि ऊस वाहतूक सुरू करू देणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. याच भूमिकेतून माढा-पंढरपूर तालुक्यांत ऊस वाहतूक करणारी वाहने रोखण्यात आली, तर भीमानगर येथे बारामती ॲग्रो कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, उत्पादन खर्चाची भरपाई होऊन शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे शिल्लक राहावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्षाच्या मैदानात उतरली आहे. कारखानदारांनी तातडीने ऊस दर जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या या आंदोलनातून देण्यात आला आहे.

“दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड नाही; शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळाल्याशिवाय माघार नाही!” हा निर्धार व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराच्या लढ्याला सुरुवात केली आहे. आगामी काळात या आंदोलनाची धग संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता आहे.

Previous Post

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

Related Posts

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’
Blog

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

October 8, 2026
उजनी धरणातून ठराविक तालुक्यासाठीच बेसुमार पाण्याचा उपसा…पाणीसाठा @85%
Blog

उजनी धरणातून ठराविक तालुक्यासाठीच बेसुमार पाण्याचा उपसा…पाणीसाठा @85%

October 8, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा
Blog

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

October 7, 2026
आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?
Blog

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026