महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटनेची मागणी..
ई केवायसी ची मुदत वाढवून मिळणार…
शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संस्थापक ज्ञानेश्वर म्हात्रे आणि संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अप्पासाहेब पाटील व शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे व शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध मागणीचे निवेदन दिले.
या निवेदनामध्ये दिनांक 1 सप्टेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षेचे आयोजन करणे, राज्यातील त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना तसेच अंशतः अनुदानित सैनिकी शाळा व तुकड्यांना वाढीसाठी अनुदान टप्पा देणे, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १० – २० – ३० आश्वासित प्रगती योजना लागू करणे, यासह इतर मागण्या करण्यात आले.
शिक्षण आयुक्त यांनी देखील ई केवायसी संदर्भात मुदत वाढवून देण्याचे











