• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 23, 2026
in Blog
0
आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे
0
SHARES
0
VIEWS

पात्र रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी प्रशासन व रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे; योजनेची व्याप्ती, उपचार पॅकेजेस आणि रुग्णालयांची संख्या वाढली

सोलापूर, दि. २३ : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांना मिळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांनी योजनांमध्ये सहभागी होऊन प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. पात्र रुग्णांना योजनेंतर्गत मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. सुरुवातीला समन्वयाने रुग्णालयांना योजनेत सहभागी करून घ्यावे आणि आवश्यकतेनुसार कायद्याच्या चौकटीत सक्तीची कार्यवाही करावी, असे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील योजनांची सद्यस्थिती, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या उपचार सुविधा, रुग्णालयांचा सहभाग आणि योजनांची व्याप्ती वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांची तातडीने बैठक घेऊन त्यांना योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. प्रशासन आणि रुग्णालयांनी समन्वयाने काम करून पात्र लाभार्थ्यांना उपचारांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

धर्मादाय तसेच मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये गरीब व पात्र रुग्णांसाठी किमान २५ टक्के बेड राखीव ठेवणे बंधनकारक असून, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे डॉ. शेटे यांनी स्पष्ट केले. योजनेंतर्गत उपचारांना मंजुरी मिळेपर्यंत रुग्णांकडून पैसे भरण्याची सक्ती करणे किंवा औषधे बाहेरून आणण्यास सांगणे, अशा तक्रारींचीही बैठकीत दखल घेण्यात आली.

याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, २४ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन ‘टीएमएस २.०’ पोर्टल सुरू झाले आहे. या प्रणालीमध्ये रुग्णालयाने उपचार मंजुरीसाठी अर्ज केल्यानंतर सहा तासांच्या आत मंजुरी देणे बंधनकारक आहे. निर्धारित वेळेत मंजुरी न मिळाल्यास प्रणालीद्वारे ती आपोआप मंजूर ग्राह्य धरली जाण्याची तरतूद आहे. आपत्कालीन उपचारांसाठी ७२ तासांची सवलत असून, उपचारासाठी रुग्णाने आधी भरलेली रक्कम परत देणे रुग्णालयांना बंधनकारक असल्याची माहिती त्यांनी दिली.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचारांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून, नोव्हेंबरपर्यंतच्या आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीत ७७ हजार ४०२ रुग्णांनी 232 कोटी रुपयांच्या उपचारांचा लाभ घेतला आहे. राज्यभरात योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, सोलापूर जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक असल्याचे डॉ. शेटे यांनी सांगितले.

योजनेतील उपचार पॅकेजेस आणि रुग्णालयांची संख्या वाढविण्यात आली आहे. पूर्वी २,३४६ उपचार पॅकेजेस आणि ४,५०० रुग्णालये होती. आता ही संख्या वाढवून ३,३९९ उपचार पॅकेजेस आणि ५,००० रुग्णालये करण्यात आली आहे. तसेच योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद ४५० कोटी रुपयांवरून ५,४०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक पात्र नागरिकांना उपचारांचा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

योजनांची प्रभावी अंमलबजावणी, रुग्णालयांचा सक्रिय सहभाग, पात्र लाभार्थ्यांना वेळेत उपचार आणि उपचारादरम्यान आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी महानगरपालिका, आरोग्य विभाग व संबंधित रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीस सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गुंजाळ, डीएमओ गणेश धुमाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पाडुळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) लक्ष्मण कसेकर तसेच शहर व जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे डॉक्टर व प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous Post

महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव

Related Posts

महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव
Blog

महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव

November 23, 2026
जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू
Blog

जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

November 23, 2026
Bisleri च्या पॅकबंद पाण्याचा नमुना दोनदा ठरला फेल! कर्करोगाशी संबंधित घटक आढळल्याने कंपनीविरोधात खटला दाखल होणार
Blog

Bisleri च्या पॅकबंद पाण्याचा नमुना दोनदा ठरला फेल! कर्करोगाशी संबंधित घटक आढळल्याने कंपनीविरोधात खटला दाखल होणार

November 23, 2026
संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप
Blog

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

November 22, 2026
नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान
Blog

नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान

November 21, 2026
विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत
Blog

विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

November 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे

आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे – डॉ. ओमप्रकाश शेटे

November 23, 2026
महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव

महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव

November 23, 2026
मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

November 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026