• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात दहा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात दहा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम
0
SHARES
1
VIEWS

विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महामानवास होणार अभिवादन

समता कार्यक्रमाचे उदघाटन

सोलापूर: सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात आजपासून सलग दहा दिवस विविध कार्यक्रमांचे नियोजन केल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी दिली.

        यावेळी सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून समता कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी आढे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील यांच्यासह विविध समाजकार्य महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

         अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सामान्य जनतेला व्हावी, त्याचे उद्देश साध्य व्हावेत, यासाठी जिल्ह्यात 6 एप्रिल ते 16 एप्रिल यादरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या वतीने "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" राबविण्यात येणार आहे, असल्याचे  आढे यांनी सांगितले.

असा असेल सामाजिक समता कार्यक्रम…

गुरूवार दि.7 एप्रिल 2022 रोजी महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार यावर वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन श्री. आढे यांनी केले आहे. शुक्रवार दि.8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्वाधार, शिष्यवृत्ती, योजनांची माहिती आणि लघुनाटिका भारती विद्यापीठ, समाजकार्य महाविद्यालय, सोलापूर येथे तर तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीही हे कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सामाजिक न्याय भवन आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रक्तदान शिबीर तर 11 वाजता ज्येष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व मेळावा भारती विद्यापीठाचे, समाजकार्य महाविद्यालय येथे होणार आहे. रविवारी 10 एप्रिलला सकाळी 8 वाजता पार्क चौक तर 9 वाजता सात रस्ता येथे पथनाट्य आणि लघुनाट्य सादर होणार आहे.

सोमवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महात्मा फुले जयंती साजरी करणे आणि यशवंतराव चव्हाण, सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे कृषी अधिकारी कल्याण श्रावस्ती यांचे महात्मा फुले सामाजिक कार्यावर व्याख्यान, मंगळवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता सामाजिक न्याय भवन येथे मार्जिन मनी योजनेबाबत कार्यशाळा, 13 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता सर्व महाविद्यालयात संविधान जनजागृती कार्यक्रम, 14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती/शेतकऱ्यांविषयी विचारांवर प्रा. गौतम कांबळे यांचे व्याख्यान. याशिवाय दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेबाबत मेळावा होणार आहे.

        शुक्रवारी 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल प्रा. डॉ. ज्योतिवाघमारे, डॉ. जयश्री मेहता व डॉ. निशा वाघमारे यांचे व्याख्यान व तृतीयपंथी व्यक्ती जनजागृती कार्यशाळा होणार आहे. शनिवारी 16 एप्रिल रोजी समता कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. यादिवशी अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीमध्ये स्वच्छता व लाभार्थी मनोगत होणार आहे, अशी माहिती  आढे यांनी दिली.
Previous Post

तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी त्यांच्या गुरूंनी सहकार्य करावे – श्रीकांत देशपांडे

Next Post

तिढा सुटला : २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा; हायकोर्टाचा आदेश

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
तिढा सुटला : २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा; हायकोर्टाचा आदेश

तिढा सुटला : २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा; हायकोर्टाचा आदेश

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026