• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ज्ञानेश्वरी हे आत्मानंदाचे तत्त्वज्ञानस्वामी गोविंददेव गिरिजी यांचे प्रतिपादन…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 2, 2024
in इतर घडामोडी
0
ज्ञानेश्वरी हे आत्मानंदाचे तत्त्वज्ञानस्वामी गोविंददेव गिरिजी यांचे प्रतिपादन…
0
SHARES
1
VIEWS


सोलापूर : ज्ञानेश्वरी हे आत्मानंदाचे तत्त्वज्ञान असल्याचे अयोध्या येथील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी मंगळवारी स्पष्ट केले.’ साई सुपर मार्केट’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी भावकथा या विषयावरील सप्ताहात ते बोलत होते.k

भगवद्गीतेला महाभारतातील कमळ म्हणतात. या कमळातील सुगंधित पराग म्हणजे महाभारत असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, असे सांगून स्वामी गोविंददेव गिरीजी म्हणाले की, आरशात आपल्याला दिसते ते आत्मरूप नसते. आत्मरूपाचा शोध घ्यायचा आहे, मी कोण आहे याचा वेध घेण्यासाठी ज्ञानेश्वरी अभ्यासायला हवी असेही त्यांनी सांगितले. आत्मरंगातल्या आत्मतत्त्वाला माऊली प्रणाम करतात आणि म्हणूनच ‘ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या’ असे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच सांगतात. ऋषी व आचार्य देखील नेहमी सांगत असतात की, स्मृति- श्रुती- पुराणांनी जे सांगितले आहे, तेच आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगत आहोत. रमण महर्षी यांनी को$हम या एका शब्दाचा अर्थ कळावा म्हणून पूर्ण आयुष्य खर्ची घातले, असेही स्वामींनी स्पष्ट केले. माऊलींनी वांग्मय गणेश मूर्ती असल्याचे म्हटले आहे . वेदांतशास्त्राला गणपतीच्या हातातला मोदक असल्याची उपमा माऊलींनी दिली आहे.

ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचे भाष्य आहे, ही गोष्ट सत्य आहे. परंतु तो केवळ टीकाग्रंथ नाही तर ज्ञानेश्वरीत अनेक बाहेरच्या गोष्टीही सांगितल्या आहेत , असे विवेचन स्वामीजींनी केले. ज्ञानेश्वरी मध्ये २२ ठिकाणी ही कथा असल्याचे श्री ज्ञानेश्वरांनीच म्हटले असल्याचे सांगून स्वामीजी म्हणाले की, ज्ञानेश्वरी या अद्वितीय आणि अतुलनीय ग्रंथाचा भावार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे.

चार पुरुषार्थ चार आश्रम चार वर्ण आणि चार साधने ( ज्ञान, कर्म , योग आणि भक्ती ) अशा सोळा स्तंभांवर आपली संस्कृती उभी असल्याचे स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी स्पष्ट केले. ज्ञानेश्वरी ही अति हळुवारपणे आणि कोमल मनाने ऐकायला हवी असेही त्यांनी सांगितले. चकोर पक्षाची पिल्ले ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचे अमृत प्राशन करतात तसे आपले मन ज्ञानेश्वरी समजावून घेताना कोमल असायला हवे, असेही स्वामीजींनी सांगितले. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने कोमल बनायलाच हवे, असे सांगून स्वामीजी म्हणाले की गीता नीट कळणे निश्चितच अवघड आहे. गीता वाचत असताना ती नित्य नूतन वाटते .

अर्जुनाने कुरुक्षेत्रावर जेव्हा भगवंतांना सांगितले की मी माझ्या आप्त सुखीयांवर बाण सोडणार नाही. ज्यांनी मला शिकविले , प्रेम दिले आणि घडवले त्यांच्यावर मी बाण कसा सोडू. परंतु दया कोठे करावी हे भगवंताला नेमके माहिती होते. त्याने अर्जुनाला कठोरपणे सांगितले की, तू क्षत्रिय आहेस आणि युद्ध करणे तुझा धर्म आहे.
उपजे ते नाशे |
नाशले पुनरपी दिसे|
हे घटका यंत्र जैसे|
परिभ्रमे गा|
अध्याय दोन ,ओवी १५९
ही ज्ञानेश्वरीतील ओवी सांगत स्वामीजी म्हणाले की, शरीर हे आवरण आहे हे कळायला हवे. अंतरंगातला मी महत्त्वाचा, हे जेव्हा समजेल तेव्हा ज्ञानेश्वरी कळायला वेळ लागणार नाही.

भगवदगीता ही कर्तव्यनिष्ठा शिकविते. या कर्तव्यनिष्ठेबाबत माऊली काय म्हणतात, याचे विवेचन उद्या बुधवारी करणार असल्याचे स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी सांगितले.

  • भव्य शोभायात्रेने ज्ञानेश्वरी भावकथेचा प्रारंभ.
  • ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पालखीतून तर स्वामीजींचे बगीतून कार्यक्रम स्थळी आगमन झाले.
  • साई सुपर मार्केटच्या उद्घाटन प्रसंगी रमेशभाई ओझा यांनी म्हटले होते की, जगाने मंदिराला दुकान केले आहे तुम्ही दुकानाचे मंदिर करा. याच ध्येयातून साई सुपर मार्केट ची वाटचाल चालू असल्याचे सुरुवातीला पायल मुंदडा यांनी स्पष्ट केले.
  • साई सुपर मार्केटच्या आज रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत ५ शाखा कार्यरत आहेत.
  • आत्मज्ञानाचा उपदेश कोणीतरी मागितल्याशिवाय करू नये, म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाने जेव्हा मला काहीही कळत नाही, मी निर्णय घेताना अडखळत आहे, असे म्हटल्यानंतर त्याला योग्य सल्ला दिला, असेही स्वामीजी म्हणाले.
Tags: #DivineWeekInSolapur#DnyaneshwariBhavkatha#GovinddevGirijiMaharaj#SolapurSpiritualJourney#SpiritualAwakening2023
Previous Post

सोलापूर विद्यापीठ व सिंहगड महाविद्यालयातर्फे फेब्रुवारीत रेशीम उद्योगविषयक आंतरराष्ट्रीय परिषद!

Next Post

लिंगायत भवनच्या निधीकरीता माजी आमदार रविकांत पाटील जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवार यांची भेट…

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
लिंगायत भवनच्या निधीकरीता माजी आमदार रविकांत पाटील जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवार यांची भेट…

लिंगायत भवनच्या निधीकरीता माजी आमदार रविकांत पाटील जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवार यांची भेट…

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026