डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
सोलापूर : भारतीय संविधानाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी तसेच संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी सागर सोनवणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) प्रसाद मिरकले, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश नांगरे , सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी नितीन जाधव तसेच शाहू गायकवाड, विजयकुमार रणदिवे, किरण गोरे, स्वाती गायकवाड, विद्या हूनचीकट्टी, मल्लिकार्जुन मळगे, दिनेश कांबळे आणि अरिहंत व्हटकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












