• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गावांच्या विकासासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करावे; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 26, 2026
in इतर घडामोडी
0
गावांच्या विकासासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करावे; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

घरकुलांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, संविधान दिनानिमित्त सामूहिक उद्देशिकेचे वाचन

पंढरपूर : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून, या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेने समन्वयाने व जबाबदारीने प्रयत्न करावेत. अभियानातील निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करून प्रत्येक गावाच्या विकासाला नवी दिशा द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
पंचायत समिती पंढरपूर येथे आयोजित अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सूर्यकांत भुजबळ, पंचायत समितीचे सभापती शुभम आगवणे, उपसभापती प्रमोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, संतोष बागल, शहाजी मुळे, श्रीमती आकाताई लोखंडे, श्रीमती भोसले, श्री. झांबरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सूर्यकांत भुजबळ आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर अमोल जाधव उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि विकासकामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीने अभियानातील निकष समजून घेऊन त्यानुसार कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. केवळ कागदोपत्री पूर्तता न करता गावपातळीवर प्रत्यक्ष कामातून विकास दिसला पाहिजे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले.

घरकुल योजनांचा आढावा घेताना ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही, अशा प्रकरणांमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून तातडीने बांधकाम सुरू करून घ्यावे. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी नियमित पाठपुरावा करावा. घरकुलांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रियपणे काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आज २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त पंचायत समिती पंढरपूर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. भारतीय संविधानाने देशाला दिलेली लोकशाही मूल्ये, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.या आढावा बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.आढाव बैठक यशस्वी करण्यासाठी कक्ष अधिकारी शाहाजान तांबोळी वरिष्ठ सहाय्यक महेश वैद्य यांनी परिश्रम घेतले

ग्रामीण विकासाला गती देणे, शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकसहभागातून सक्षम व आदर्श ग्रामपंचायती निर्माण करणे, हेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे उद्दिष्ट असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असा संदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी यावेळी दिले.

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!

November 26, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

November 26, 2026
दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर
इतर घडामोडी

दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

November 26, 2026
संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
इतर घडामोडी

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

November 26, 2026
किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!
इतर घडामोडी

किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!

November 26, 2026
हयातीचा दाखला सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरला विशेष मेळावा
इतर घडामोडी

हयातीचा दाखला सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरला विशेष मेळावा

November 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावांच्या विकासासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करावे; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन

गावांच्या विकासासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करावे; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन

November 26, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!

सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!

November 26, 2026
संविधान दिन म्हणजे काय?

संविधान दिन म्हणजे काय?

November 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026