• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2026
in इतर घडामोडी
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
0
SHARES
1
VIEWS

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला पौष्टिक पाककृतींचा आस्वाद; अंगणवाडी सेविकांच्या कौशल्याचे केले कौतुक

सोलापूर: सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने तसेच ९व्या राष्ट्रीय पोषण माहनिमित्त जिल्हा परिषद, सोलापूरच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘घरपोच आहार’ आधारित जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अंगणवाडी सेविकांच्या कल्पकतेला चालना देणे, पौष्टिक, सकस व स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांपासून तयार होणाऱ्या आहाराला प्रोत्साहन देणे, तसेच बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या पोषणासाठी घरपोच आहाराचा प्रभावी वापर वाढविणे, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून लोकाभिमुख सेवा, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या स्पर्धेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षण आहारतज्ज्ञ सोनाली घोंगडे, सुप्रिया विभुते आणि अनिता शेळके यांनी केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी अंगणवाडी सेविकांनी तयार केलेल्या विविध पौष्टिक पाककृतींची पाहणी करून त्यांचा आस्वाद घेतला. पाककृतींमध्ये वापरण्यात आलेले घटक, त्यातील उष्मांक, प्रथिने तसेच पोषणमूल्यांबाबत त्यांनी सेविकांकडून माहिती जाणून घेतली. स्थानिक व सहज उपलब्ध पदार्थांचा कल्पकतेने वापर करून तयार केलेल्या नावीन्यपूर्ण पाककृतींचे त्यांनी कौतुक केले.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय पोषण माहचे महत्त्व स्पष्ट केले. कुपोषण निर्मूलनासाठी घरपोच आहाराचा प्रभावी वापर, योग्य पोषण आणि संतुलित आहाराचे महत्त्व याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाला हा उपक्रम पूरक ठरणारा आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पोषणविषयक जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कक्ष अधिकारी प्रताप रुपनर, वरिष्ठ सहाय्यक रेणुका प्रथमशेट्टी, कनिष्ठ सहाय्यक शिंदे, साहेबराव देशमुख, जिल्हा समन्वयक ऐश्वर्या पवार, अर्चना निंबाळकर, पर्यवेक्षिका अश्विनी चटमुटगे, अमिता वसेकर आणि श्रीकांत मेहेरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

Related Posts

इतर घडामोडी

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026
कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!
इतर घडामोडी

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026
ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान
इतर घडामोडी

एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026