• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2026
in Blog
0
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
0
SHARES
0
VIEWS

पिकांचे नुकसान, पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा घेतला आढावा; पंचनामे सरसकट व अचूक करण्याचे निर्देश

नुकसानीचे अनुदान थेट बँक खात्यात द्यावे; चारा डेपो व चारा छावण्यांऐवजी थेट अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

सोलापूर – जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, कोरड्या पडलेल्या विहिरी तसेच जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट पंचनामे करून नुकसानीची वस्तुनिष्ठ व अचूक नोंद घेण्याच्या सूचना दिल्या.

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचोळी आणि शिरसी या गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच कोरड्या पडलेल्या विहिरी, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची माहिती घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि चाऱ्याची उपलब्धता याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

लेंडवे चिंचोळी येथे टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. टँकरमधून नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे किंवा नाही, याची माहिती घेतली. तसेच पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे किंवा नाही, याचीही त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांना नियोजित वेळेनुसार व आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगोला तालुक्यातील वाकी(घेरडी), बुरलेवाडी, वाडेगाव, वाणीचिंचोळी आणि राजापूर या गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता, विहिरींची पाणीपातळी, जनावरांसाठी उपलब्ध चारा तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच दोन्ही तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सरसकट करण्यात येत असल्याचे सांगितले. निर्धारित कालावधीत पंचनाम्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, सांगोला तहसीलदार बाळूबाई भागवत, मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, सांगोला तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, संबंधित मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच संबंधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांशी संवाद व त्यांच्या मागण्या –
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. यावेळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रशासनामार्फत वेळेत प्रस्ताव सादर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी केली. तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन व जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन करावे. चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यास चाऱ्यासाठीचे अनुदानही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उपलब्ध करून द्यावे. चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्याऐवजी थेट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Previous Post

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

Next Post

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

Related Posts

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
Blog

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

September 28, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी
Blog

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

September 28, 2026
दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख
Blog

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

September 28, 2026
सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?
Blog

सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?

September 28, 2026
Next Post
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026