सोलापूर महापालिकेचे स्वच्छतेसाठी हजारो कर्मचारी राबतात… घंटागाड्या आहेत.. झाडूवाले कर्मचारी आहेत.. घनकचरा विभागाच्या माध्यमातून तसेच धूळ कमी करण्यासाठी राष्ट्रीय धूळ मुक्त अभियानातून कोट्यावधी रुपये दरमहा शहरात खर्च होतात मात्र म्हणाव्या त्या पद्धतीने महापालिकेची यंत्रणा काम करत नाही. विविध विभागांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे शहरात जिकडेतिकडे खड्ड्यांचे आणि कचऱ्याचे साम्राज्य दिसते . तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी झपाटल्यागत काम करून गेल्या वर्षी शहर स्वच्छ करून दाखवले होते. त्यानंतर स्वच्छतेच्या कामात खंड पडला. महापालिकेचे नूतन नगरसेवक तसेच नागरिक या कचऱ्यामुळे हैराण झाले आहेत. एकीकडे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे शासनाकडून मिळालेले चार रोड स्वीपर धूळ खात पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. ते रात्री उभा राहून मनपाच्या यंत्रणेकडून शहर स्वच्छ करून घेऊ लागले आहेत. शिवाय त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करू लागले आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ झाले पाहिजे आणि यामध्ये सातत्य असले पाहिजे यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या स्वच्छतेच्या कामाच्या पाठपुराव्याबद्दल शहरवासीयातून कौतुक होत आहे,











