सोलापूर शहरात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या दोन उड्डाणपूलांची चर्चा गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे. प्रत्यक्षात याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एक हजार कोटी रुपयांची ही निविदा होती मात्र दिलीप बिल्डकॉन यांची निविदा 28 टक्के कमी दराने असल्यामुळे ती मंजूर झाली आहे. 688 कोटी रुपयांचे हे टेंडर दिलीप बिल्डकॉनला मिळाले असून या माध्यमातून सुमारे 300 कोटी रुपये NHAI चे वाचले आहेत. निधीची जुळवा जुळवून करून प्रत्यक्षात सहा महिन्यात हे काम सुरू होईल. अडीच वर्षात काम संपल्यानंतर या दोन्ही उड्डाणपुलाच्या वापरासाठी सोलापूरकरांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आता किती वाहनधारक हे टोल देऊन उड्डाणपूल करावेत या मताशी तयार आहेत याबाबत त्यांनी एस न्यूज मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मते नोंदवावीत.










