• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अभ्यासात अपयश आल्यास खचू नका – उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 14, 2022
in इतर घडामोडी
0
अभ्यासात अपयश आल्यास खचू नका – उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांसह, इतर पुस्तकांचा अभ्यास करावा. अपयश आले म्हणून खचून न जाता जोमाने अभ्यास केल्यास यश नक्की मिळते, असे प्रतिपादन महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी केले.

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’निमित्त आयोजित व्याख्यानात अध्यक्ष म्हणून श्री. उदमले बोलत होते. यावेळी तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, प्रमुख वक्त प्राचार्य हरिदास रणदिवे, लेखक ज्ञानेश्वर जाधवर, उपायुक्त श्रीमती भगत, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

उदमले यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या पुस्तकासोबत इतर पुस्तकांचा, ग्रंथही वाचावेत. कोणतेही पुस्तक वाचले तर त्यातून तुम्हाला तुमच्या जीवनात उपयोगी पडेल, असेच असेल. वाचन केल्यास मार्गक्रमण करण्यास प्रेरणा मिळते, अभ्यास करून अधिकारी होऊन राज्याच्या विकासात भर घालण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘जगण्याची प्रेरणा वाचन’ यावर बोलताना प्राचार्य रणदिवे यांनी सांगितले की, जीवनात असण्याला अर्थ आहे. जगण्यासाठी काही तरी साध्य लागते, त्यातून प्रेरणा निर्माण होते. सतत कार्यमग्न राहिल्यास कायम आनंदी आणि दीर्घायुष्य राहते, याबाबतचे जपानमधील गावाचे त्यांनी उदाहरण दिले. निवृत्तीची चिंता न करता प्रत्येकांनी स्वत:ला कामात गुंतवून घेतल्यास आनंद मिळण्यास मदत होईल. स्वातंत्र्यवीर भगतसिंग यांना तुरूंगातही वाचनाची आवड होती. मृत्यूच्या शेवटच्या क्षणांपर्यंत ते वाचन करीत होते. यामुळे प्रत्येकांनी आवर्जुन वेळ काढून वाचन करावे.

वाचन हा स्थायीभाव होऊन ग्रंथ आपलेसे करावेत. पुस्तक कधी डिस्चार्ज होत नाहीत, वयावर आणि आजारावर वाचन मात करू शकते. शरीराला व्यायामाची आवश्यकता आहे, तसे वाचन केल्याने मेंदूला व्यायाम होतो. प्रत्येक गावात सुसज्ज वाचनालय हवे, त्यांना नाविन्यपूर्ण योजनेतून स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि इंटरनेट देण्याची मागणीही रणदिवे यांनी केली.
जाधवर यांनी सांगितले की, साहित्यिक समाजाला दिशा देण्याचे काम करतात. समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यामध्ये ग्रंथांचे मोठे योगदान आहे. डिजीटल तंत्रज्ञानामुळे साहित्यातील बिभित्सपणा यायला नको, वाचकांनी आपण काय वाचावे, हे ठरवावे. प्रत्येकांनी आत्मबळ वाढविणारे साहित्य वाचले पाहिजे. जिथे मिळेल, जे मिळेल ते वाचा. त्यातून आनंद मिळतो. वाचन संस्कृती, वाचक चळवळी वाढल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी उदमले यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि ग्रंथालय चळवळीचे रंगनाथन यांच्या प्रतिमांचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी परिसर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी डीएड आणि बीएड महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकातून ग्रंथालय अधिकारी जाधव यांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार यांनी केले तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.

Previous Post

प्रत्येक प्रवाशाला सीटबेल्ट लावणे बंधनकारक, १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

Next Post

जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या झाली कमी

Related Posts

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
Next Post
जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या झाली कमी

जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या झाली कमी

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026