• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या झाली कमी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 14, 2022
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या झाली कमी
0
SHARES
2
VIEWS

आता दीर्घकालीन उपाययोजना करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर : जिल्ह्यात अपघातात मरणारे, गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. मात्र याबरोबरच जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या कमी होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. उर्वरित अपघातप्रवण क्षेत्रात आता दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत शंभरकर बोलत होते. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अनिल विपत, रोहित दुधाळ यांच्यासह समितीमधील सदस्य उपस्थित होते.

शंभरकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागात 55 अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) होते ते आता 23 वर आले आहेत. शहरातील 21 ब्लॅक स्पॉटचे 29 झाले आहेत. ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी आय रॅडचा ॲपचा वापर वाढवा. अपघात हे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात होतात. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने महामार्गावरील सर्व वळण रस्ते, प्रवेश, मोक्याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. रस्त्यावर अपघात घडल्यानंतर सर्व विभागाची यंत्रणा 48 तासांच्या आत पोहोचून अपघात घडल्याचे कारण जाणून घेतात. पुन्हा त्याठिकाणी अपघात घडू नये, यासाठी कार्यवाही करतात. मात्र अपघात घडल्यानंतर जखमींना त्वरित मदत पोहोचली तर त्याचे प्राण वाचू शकतात. म्हणून सर्व विभागाच्या सहकार्याने यंत्रणा उभी करायला हवी. अपघातातील जखमींचे प्राण वाचविण्यासाठी मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून काम करावे.

महामार्गावर वळणाच्या ठिकाणी आणि गतीरोधकावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावाव्या. महामार्गावर नो पार्किंग झोन, लेन बदलणेबाबत जागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. रस्ते दुरूस्ती आणि इतर कामे सुरू असलेल्या ठिकाणी अपघात होत असल्याने कामापासून दोन-तीन किमीपासूनच सूचना फलक लावावेत, असेही त्यांनी सांगितले.

साखर कारखान्यांचा गळित हंगाम सध्या सुरू होत आहे. यामुळे सर्व साखर कारखान्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर, बैलगाडी, ट्रक या वाहनांना लाल रंगाचे रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचनाही शंभरकर यांनी केल्या. गायकवाड यांनी रस्ते सुरक्षेबाबतची माहिती दिली.

Previous Post

अभ्यासात अपयश आल्यास खचू नका – उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांचे आवाहन

Next Post

के. राज फिटनेसची शरीरसौष्ठव स्पर्धेत भरारी

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
के. राज फिटनेसची शरीरसौष्ठव स्पर्धेत भरारी

के. राज फिटनेसची शरीरसौष्ठव स्पर्धेत भरारी

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026