सोलापूर : पकडलेल्या वाळूच्या ट्रॉलीवर कारवाई न करता सोडण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक लोकसेवक संतोष बाबु चव्हाण याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ आणि ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीच्या पोलीस निरीक्षक कविता मुसळे करीत आहेत. सदरची कारवाई एसीबी साताऱ्याचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या पथकाने केली आहे.
