सोलापूर : सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालयाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २ जून रोजी २,६२० वाहनांची तपासणी करून २,२९,८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मास्क न वापरणाऱ्या ३३३ नागरिकांवर कारवाई करून एक लाख ६६,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने ३०० व्यक्तींविरुद्ध कारवाई करून ६०,३०० रुपये दंड करण्यात आला नाका-बंदी दरम्यान तेवीस वाहने जप्त करण्यात आली.
