• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्याने आर्थिक विकासाला चालना मिळणार- मंत्री मुरलीधर मोहोळ

Yes News Marathi by Yes News Marathi
June 9, 2025
in इतर घडामोडी
0
देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्याने आर्थिक विकासाला चालना मिळणार- मंत्री मुरलीधर मोहोळ
0
SHARES
1
VIEWS

केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोलापूर विमानतळ येथून फ्लाय 91 विमान कंपनीच्या विमानाला झेंडा दाखवून विमान सेवेचा शुभारंभ करण्यात आला

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करणार

उड्डान योजनेअंतर्गत सोलापूर येथून तिरुपती, हैदराबाद व बेंगलोरला विमान सेवा सुरू करणार

सोलापूर – आजचा दिवस हा सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा ही विमान सेवा सुरू होत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा हा देशाच्या हवाई क्षेत्राशी जोडला गेला आहे. यातून सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू केली जाणार असल्याची ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

    विमानतळ प्राधिकरण परिसरात आयोजित सोलापूर ते गोवा विमान सेवा उद्घाटन समारंभ प्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ मार्गदर्शन करत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार  विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते पाटील, देवेंद्र कोठे, उत्तम जानकर, अभिजित पाटील, राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच माजी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज, माजी आमदार राजेंद्र राऊत, राम सातपुते, विमानतळ प्राधिकरण च संचालक चंद्रेश वंजारा, फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे सीईओ दिनेश चाको, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते 


केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मोहोळ पुढे म्हणाले की सोलापूर हे दक्षिण पश्चिम भागाला जोडणारा केंद्रबिंदू आहे, त्याचबरोबर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठिकाण असून येथून सुरू झालेली विमानसेवा ही सोलापूर सह या भागाच्या विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांनाही याचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले. 


विमान कंपन्या एखाद्या शहरातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना लाभ मिळू शकेल का याचा विचार अगोदर करतात. त्यानंतरच विमानसेवा सुरू केली जाते आजपासून गोव्याला विमानसेवा सुरू झालेली आहेच, परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसाठी ही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक  प्रयत्नातून गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे, त्याप्रमाणेच मुंबईसाठी ही लवकरच ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती  मोहोळ यांनी यावेळी दिली. तसेच सोलापूर विमानतळ येथून केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत तिरुपती हैदराबाद व बेंगलोर साठी ही विमानसेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. तसेच या विमानतळावर वातावरण स्पष्टता बाबत तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही यासाठी डीवॉल सिस्टीम बसवणे तसेच नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध करणे या अनुषंगाने पुढील काळात काम केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

     पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विमानसेवा शुभारंभाचा आजचा हा दिवस सोलापूर साठी आनंदाचा दिवस असल्याचे सांगून सोलापूरच्या उद्योग, व्यवसाय व पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण आहे. पहिल्या टप्प्यात गोवा येथे सेवा सुरू होत असून गोवा येथून देश व विदेशात सर्व ठिकाणी विमानाने प्रवास करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मुंबईची विमान सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. ही विमान सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पत्रकार व विकास मंच यांनी केलेल्या पाठपुराव्याचे पालकमंत्री यांनी कौतुक केले.

सोलापूर विमानतळ प्राधिकरणचे संचालक चंद्रेश वंजारा यांनी आपल्या प्रास्ताविकात सोलापूर विमान तळासाठी करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती दिली. विकासासाठी हवाई संपर्क महत्त्वाचा असल्याचे सांगून ही विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न कामी आल्याचे त्यांनी सांगितले.

पाच प्रवाशांना बोर्डिंग पास :-
आजच्या शुभारंभाच्या विमानामध्ये प्रवास करणाऱ्या सोलापूर येथील पाच प्रवाशांना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते, प्रातिनिधिक स्वरूपात बोर्डिंग पास देण्यात आले. यामध्ये चेतन लोढा, बाळकृष्ण दोड्डी, शिवाजी सुरवसे, प्रीती शिंदे व केतन शहा या विमान प्रवाशांचा समावेश आहे. तसेच फ्लाय 91 या विमान कंपनीच्या विमानातून गोवा येथून सोलापूर विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे स्वागत पुष्पहार देऊन करण्यात आले.

झेंडा दाखवून विमान सेवेचा शुभारंभ –
सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच फ्लाय 91 कंपनीच्या विमानाला केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झेंडा दाखवून आजपासून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ केला. यावेळी सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमानतळ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

Previous Post

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सोलापूर चाप्टरचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

Next Post

बहिर्जी पथक हे शिवरायांचे मुख्य बलस्थान होते – सुधाकर इंगळे महाराज

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
बहिर्जी पथक हे शिवरायांचे मुख्य बलस्थान होते – सुधाकर इंगळे महाराज

बहिर्जी पथक हे शिवरायांचे मुख्य बलस्थान होते - सुधाकर इंगळे महाराज

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026