सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील नवीन माध्यमिक हायस्कूल व सुशीला प्रचंड खट्टे कनिष्ठ महाविद्यालयाचे खोपोली येथील “चैतन्य योग शिबीर” दिनांक 26 ते 28 डिसेंबर दरम्यान चे शिबीर उत्साहात संपन्न झाले.या शिबिरासाठी सोलापूर जिल्ह्यातून औज येथील नवीन माध्यमिक हायस्कूल व सु. प्र. खट्टे कनिष्ठ महाविद्यालय ही एकमेव शाळा सहभागी झाली होती. सदर शिबिरात या प्रशालेचे 40 विध्यार्थी सहभागी झाले होते. ही शिबीर “चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट,खोपोली यांनी आयोजित केले होते. या चैतन्य शिबिरात विध्यार्थ्यांच्या मानसिक,शारीरिक,बौद्धिक विकास साधण्यासाठी विध्यार्थ्यांस या शिबिरास नेण्यात आलेले होते.शिबिरात विद्यार्थ्यांनी शारीरिक विकास व स्व-संरक्षणासाठी लाठी काठी,कराटे, अरॉबिक्स,बौद्धिक विकासासाठी “त्राटक व योगिक निद्रा” व मानसिक विकासासाठी प्राणायाम, आसन,”सक्रिय ध्यान” चे विविध क्रिया समजावून घेतले.

या चैतन्य शिबिरास यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सिद्राम खट्टे सर, प्रशालेचे व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्या सुजाता खट्टे, शिलेणी, प्रशालेचे सहशिक्षक विरेंद्र मठपती,नरेंद्र घोडके,संतोषकुमार बोधले,नितीन चव्हाण,सिद्राम व्हनमाने,सरस्वती कोले,अनिता खरात,खंडेराव खांडेकर, रेणुका कोळी,संजय खट्टे व शिक्षकेत्तर कर्मचारी सोमनाथ व्हनमाने, सिद्धाराम सोमेश्वर आदीनीं परिश्रम घेतले. पालक वर्गातून प्रशालेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

