जामश्री – इलिझियम सोलापूर ओपन 2025,महिलांच्या $ 30,000/- रकमेच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या वैदेही चौधरी हिला विजेतेपद
सोलापूर – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओॲसिस, प्रिसीजन, इलिझियम-जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत जामश्री – इलिझियम सोलापूर ओपन 2025 महिलांच्या $30,000/- रकमेच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या वैदेही चौधरी हिने विजेतेपद संपादन केले.
एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत अंतिम फेरीत सहाव्या मानांकित भारताच्या वैदेही चौधरी हिने जपानच्या मिचिका ओझेकी चा 3-6, 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे प्रायोजक जामश्री चे बर्जीन मास्टर इलिजियम क्लब चे शर्लि डिसूझा व सौरभ गुप्ता यांचा एम राज कुमार , पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला . उपविजेती जपानची मिचीका ओझेकी ला राम रेड्डी यांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देऊन तसेच विजेत्या भारताची वैदेही चौधरीला शर्लि डिसूझा यांच्या हस्ते चषक व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले .तसेच सदर स्पर्धे दरम्यान खेळाडूंना दळणवळनाचे उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या गांधी हुंडाईचे चे ब्रिजेश गांधी यांचा सन्मान मा. पोलिस आयुक्त एम राज कुमार यांच्या हस्ते करण्यात आला .
सन २०२५ मधे लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करून सोलापूरचा नाव लौकिक केल्या बद्दल संध्याराणी बंडगर यांचा वैदेही चौधरी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला .स्पर्धे दरम्यान सर्वोत्कृष्ट बॉल बॉय म्हणून पार्थ वल्लोजी याला तर सर्वोत्कृष्ट बॉल गर्ल म्हणून अंजली गायकवाड तसेच स्पर्धे दरम्यान मोलाची कामगिरी ब जावणाऱ्या श्रीकांत कामरेड्डी , अथर्व भोसले , पर्यवेक्षक नितीन कन्नमवार , फिझिओ थेरोपिस्ट निकिता पाटील यांना मा. पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
निकाल :
मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: एकेरी:
वैदेही चौधरी(भारत)[6] वि.वि.मिचिका ओझेकी (जपान)
3-6, 6-3, 6-4.

