• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2026
in मुख्य बातमी
0
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
0
SHARES
1
VIEWS

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आध्यात्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो भाविक श्रद्धा आणि भक्तीभावाने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. यंदा आषाढी एकादशी दिनांक २५ जुलै २०२६ रोजी साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने व्यापक प्रवासी सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. आषाढी वारी २०२६ साठी पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर रेल्वे विभागामार्फत एकूण ५४ विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांमुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-

नागपूर – मिरज आषाढी विशेष (४ फेऱ्या)

  • गाडी क्र. ०१२०५ विशेष नागपूरहून दि. २३ व २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ०८.५० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
    पंढरपूर आगमन/प्रस्थान: सकाळी ०८.०० / ०८.२५
  • गाडी क्र. ०१२०६ विशेष मिरजहून दि. २४ व २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
    पंढरपूर आगमन/प्रस्थान: दुपारी ०३.५५ / ०५.००

थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहंकाळ, सलगरे आणि अरग.

रचना: २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) – एकूण १८ डबे.

नवीन अमरावती – पंढरपूर आषाढी विशेष (४ फेऱ्या)

  • गाडी क्र. ०१११९ विशेष नवीन अमरावतीहून दि. २१ व २४ जुलै २०२६ रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
  • गाडी क्र. ०११२० विशेष पंढरपूरहून दि. २२ व २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता नवीन अमरावती येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना: २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) – एकूण १८ डबे.

खामगाव – पंढरपूर आषाढी विशेष (४ फेऱ्या)

  • गाडी क्र. ०११२१ विशेष खामगावहून दि. २२ व २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
  • गाडी क्र. ०११२२ विशेष पंढरपूरहून दि. २३ व २६ जुलै २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजता खामगाव येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे: जळंब, नंदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना: २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) – एकूण १८ डबे.

भुसावळ – पंढरपूर अनारक्षित आषाढी विशेष (४ फेऱ्या)

  • गाडी क्र. ०११५९ विशेष भुसावळहून दि. २४ व २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
  • गाडी क्र. ०११६० विशेष पंढरपूरहून दि. २५ व २६ जुलै २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १.०० वाजता भुसावळ येथे पोहोचेल.

थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना: १८ सामान्य द्वितीय श्रेणी डबे (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह).

लातूर – पंढरपूर अनारक्षित आषाढी विशेष (८ फेऱ्या)

  • गाडी क्र. ०११०१ विशेष लातूरहून दि. २४, २७, २८ व २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता सुटेल व त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
  • गाडी क्र. ०११०२ विशेष पंढरपूरहून दि. २४, २७, २८ व २९ जुलै २०२६ रोजी दुपारी १.५० वाजता सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी ७.२० वाजता लातूर येथे पोहोचेल.

थांबे: हरंगुळ, औसा रोड, मुरूड, ढोकी, कळंब रोड, येडशी, धाराशिव, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी आणि मोडनिंब.

रचना: ९ शयनयान व ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह).

कोल्हापूर – कुर्डुवाडी दैनंदिन अनारक्षित आषाढी विशेष (१६ फेऱ्या)

  • गाडी क्र. ०१२०९ विशेष दि. २२ ते २९ जुलै २०२६ दरम्यान दररोज सकाळी ६.१० वाजता कोल्हापूरहून सुटेल व दुपारी १.३० वाजता कुर्डुवाडी येथे पोहोचेल.
    पंढरपूर आगमन/प्रस्थान: दुपारी १२.१५ / १२.२५
  • गाडी क्र. ०१२१० विशेष कुर्डुवाडीहून दररोज सायंकाळी ४.३० वाजता सुटेल व रात्री १०.३० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल.
    पंढरपूर आगमन/प्रस्थान: सायंकाळी ०५.३० / ०५.४०

थांबे: हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, अरग, बेलंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढाळगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळे, वसूद, सांगोला, पंढरपूर आणि मोडनिंब.

रचना: १४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह).

पुणे – मिरज दैनंदिन अनारक्षित आषाढी विशेष (१६ फेऱ्या)

  • गाडी क्र. ०१२०७ विशेष दि. २३ ते २९ जुलै २०२६ दरम्यान दररोज सकाळी ८.४० वाजता पुण्याहून सुटेल व सायंकाळी ६.४५ वाजता मिरज येथे पोहोचेल.
    पंढरपूर आगमन/प्रस्थान: ०३.५५ / ०४.००
  • गाडी क्र. ०१२०८ विशेष मिरजहून दररोज सायंकाळी ७.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता पुणे येथे पोहोचेल.
    पंढरपूर आगमन/प्रस्थान: ०९.५५ / १०.००

थांबे: हडपसर, उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, वासूद, जवळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, लंगरपेठ, कवठेमहांकाळ, सलगरे, बेलंकी आणि अरग.

रचना: १४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे (२ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह).

आरक्षण व तिकीट बुकिंग
विशेष शुल्कासह चालविण्यात येणाऱ्या आषाढी विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे रेल्वे स्थानकांवरील बुकिंग काउंटर तसेच RailOne अॅपद्वारे उपलब्ध असतील.
प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करून गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

विशेष गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी किंवा RailOne व NTES अॅप डाउनलोड करावे.

भारतीय रेल्वेच्या वतीने भारताच्या समृद्ध आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रवासी-केंद्रित वाहतूक सेवा पुरविण्याच्या बांधिलकीचा हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. सोलापूर विभाग पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत करीत असून, आषाढी वारी २०२६ चा त्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आध्यात्मिक समाधान देणारा ठरो, अशा शुभेच्छा व्यक्त करीत आहे.

Previous Post

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

Next Post

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026