• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2026
in इतर घडामोडी
0
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
0
SHARES
24
VIEWS

पंढरपूर- आषाढी शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. आषाढी यात्रा सोहळयासाठी सुमारे 12 ते 15 लाख भाविक पंढरपूरला येतात. भाविकांची सुरक्षितता व यात्रा सुकर होणेचे दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन अधिनयम 2005 मधील कलम 34 (ब) नुसार मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एस. कार्तीकेयन यांनी पारित केला असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली .

पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदीर, चौफाळा ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदीर परीसर ते महाद्वार चौक परीसर दि. 01 ते 15 जुलै या कालावधीत सकाळी 05.00 वाजेपासून ते रात्री 10.00 वाजेपर्यंत व दि. 15 जुलै नंतर 29 जुलै पर्यंत 24 तास सदर परीसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे.

आषाढी यात्रा कालावधीत शहरात येणा-या भाविकांची संख्या पाहता, श्रीकृष्ण मंदीर, चौफाळा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदीर परीसर, महाद्वार चौक परीसर या भागात भाविकांची संख्या मोठया प्रमाणात असते. तसेच या भागातून भाविक दर्शनरांगेकडे व मंदिराकडे पायी चालत जात असतात. अशावेळी ब-याच ठिकाणी प्रदक्षिणा मार्गावर, जागोजागी दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केलेले असतात, यामुळे भाविकांना रस्त्यावरून ये-जा करण्यास अडचण निर्माण होते. येणा-या दुचाकी, चारचाकीमुळे अपघाताची जास्त शक्यता व रस्त्यावर गर्दी वाढून रहदारीच्या समस्या निर्माण होतात. यामुळे गर्दी व्यवस्थापनाकरीता प्रशासनास अडचणी निर्माण होतात. शहर व परीसरातील वाहतूक व दर्शनरांग सुरळीतपणे चालणेसाठी व यात्रा कालावधीत शांतता व सुरक्षितता राहावी, यासाठी वाहन प्रतिबंधक आदेश पारीत करण्यात आले आहेत.

श्रीकृष्ण मंदीर, चौफाळा ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिम द्वार, मंदीर परीसर, महाद्वार चौक परीसरात दुचाकी, चारचाकी व इतर सर्व वाहने चालवण्यास व लावण्यास (पार्कीग) मनाई करण्यात आली आहे.तसेच मंदीर परीसरातील छोटया छोटया अरूंद रस्त्यावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आलीआहे.शासकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, मंदीर परीसरात राहणारे, मंदीरात कामकाज करणारे व्यक्तींचे वाहनांसाठी पोलीस प्रशासनाकडून पास प्राप्त झालेनंतर सदरच्या आदेशातून सूट राहील. तथापि, शासकीय कर्तव्य, मंदीरातील कर्तव्य याशिवाय इतर बाबीसाठी शासकीय व मंदीर समितीचे वाहन, कर्मचारी वाहन याचा वापर केला जाणार नाही, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.

या कालावधीमध्ये येणा-या भाविकांच्या वाहनाची पार्कीग व्यवस्था पंढरपूर नगर परीषदेमार्फत करणेत यावी. मंदीर परीसरात राहणारे, कामकाज करणारे व्यक्तींकरीता वारी कालावधीसाठी पोलीस प्रशासनाकडून पास घ्यावेत. पासधारकांना वैयक्तीक कारणासाठी मुभा राहणार नाही, वाहन पास धारकांनी ठरवून दिलेल्या जागेतच वाहन पाकींग करावे. मंदीर परिसरात व्यवसाय करणारे व्यावसायिकांच्या मालाची ने-आण करणेसाठी पोलीस प्रशासनाशी चर्चा करुन भाविकांची गैरसोय होणार नाही, अशी ठराविक वेळ निश्चीत करुन त्यादरम्यान वाहतूक होईल, याची दक्षता घ्यावी. महत्वाचे तसेच राजशिष्टाचार पात्र व्यक्तींसाठी तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी श्री. विठ्ठल रुक्मीणी मंदीरे समीतीने श्रीकृष्ण मंदीर, चौफाळयापासून ने-आण करणेकामी पर्यावरणपूरक वाहनांची व्यवस्था करावी.

आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणेचे दृष्टीने वाहन प्रतिबंध क्षेत्रामध्ये अनाधिकृतपणे वावरणाऱ्या वाहनावर शहर पोलीस निरीक्षकांनी जप्तीची कारवाई करुन सदर वाहने पोलीस स्टेशन पंढरपूर येथे दंडात्मक कारवाईसाठी जमा करण्यात यावी. तसेच सदर वाहनावर मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार मोठ्या रक्कमेचा दंडात्मक कारवाई अनुसरण्यात यावी. दंडात्मक कारवाईची संपूर्ण रक्कम वसूल झाल्याशिवाय सदरील वाहन कार्यमुक्त करण्यात येवू नये

सदरच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 अन्वये कारवाईस पात्र राहिल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?

Next Post

डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026