• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 24, 2023
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
0
SHARES
0
VIEWS

नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला
पालकमंत्री राधाकृष्ण विख-पाटील यांनी केले पालखीचे स्वागत

पंढरपूर, चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी…असा हरी नामाचा गजर करीत ‘भक्ती रसात’ चिंब न्हाहून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.


हाती दिंड्या पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा-ताणाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहे.
नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.३० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला.

पालकमंत्र्यांनी केले सारथ्य
पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासू पालखीच्या रथाचे सारथ्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. यावेळी रथात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.
पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते भाविकांना ओआरएस पाकिटाचे वितरण करण्यात आले. तद्नंतर गळ्यात वीणा घेऊन पालकमंत्री श्री. विखे पाटील पालखी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी वारकरी भविकासमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

नगरपरिषदेच्यावतीने पालखीचे स्वागत


अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगरपरिषदेच्यावतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत केले.

नेत्रदीपक रिंगण सोहळा


जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली. भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला.

अमेरिकन राजदूताची उपस्थिती
सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी पालखी सोहळ्याचा सुखद अनुभव घेण्यासाठी अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी हे आवर्जून उपस्थितीत होते.

हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी
रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली हे या रिंगण सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले. रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नाना पटोले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम सातपुते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी अधिकारी, वारकरी भाविक आणि अकलूज व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

हुमा कुरेशीने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Next Post

विठ्ठलभक्तांना शिंदे सरकारची खुशखबर, मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतानाही मुखदर्शन सुरु राहणार

Related Posts

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
Next Post
विठ्ठलभक्तांना शिंदे सरकारची खुशखबर, मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतानाही मुखदर्शन सुरु राहणार

विठ्ठलभक्तांना शिंदे सरकारची खुशखबर, मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतानाही मुखदर्शन सुरु राहणार

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026