सोलापूर : महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली आहे त्यांच्या जागेवर ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील अनेक दिवसांपासून सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बदलीची चर्चा ऐकण्यास मिळत होती निश्चित त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती मिळेल अशी चर्चा होती त्या प्रमाणे त्यांना बढती मिळाली आहे. त्यांच्या जागी आलेले दत्तात्रय कराळे हे मूळचे सोलापूर मधील देगाव येथील आहेत