ठरलं! एलन मस्क ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करणार ट्विटर

0
11

येस न्युज नेटवर्क : ट्विटरच्या संचालक मंडळानं टेस्ला कंपनीचे सर्वोसर्वा आणि जगातील श्रीमंत व्यक्तीपैंकी एक असलेल्या एलन मस्क यांना मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकण्याची परवानगी दिली आहे. ट्विटरनं मंगळवारी यूएस सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनकडे या संदर्भात रेगुलेटरी फाइलिंग केली. ट्विटर बोर्डानं एकमतानं 44 बिलियन डॉलर्समध्ये मस्क यांना खरेदीला मंजुरी दिली आहे. विलीनीकरणाचा करार मान्य करण्यासारखा आहे आणि विशेष म्हणजे, हा व्यवहार ट्विटर आणि त्याच्या भागधारकांच्या हिताचा आहे. या बातमीनंतर ट्विटरच्या शेअर्सची किंमत जवळपास तीन टक्क्यांनी वाढून 38.60 डॉलर प्रति शेअरवर पोहोचली.