हरीत वारी अभियान अंतर्गत दहा हजार वृक्ष लागवडीचे नियोजन – सिईओ दिलीप स्वामी

0
14

सोलापूर – जिल्हा परिषदेने आषाढी यात्रा कालावधीत “हरित वारी” अभियान अंतर्गत पालखी मार्गावर दहा हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करणेत आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

जिल्हा परिषदेत आज आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्गावर “ हरीत वारी” अंतर्गत वृक्ष लागवड करणे साठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गटविकास अधिकारी व उमेद अभियानातील तालुका स्तरावरील समन्वयक यांचे व्हीसी चे आयोजन करणेत आले होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.

माझी वसुंधरा अंतर्गत दोन वर्षे विविध वृक्ष लागवड करणेत आली आहे. विविध योजनांचा कृती संगम याबाबत नियोजन करणेत येत असल्याचे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, पालखी मार्गावर राष्ट्रीय महामार्गामुळे परिसरातील वृक्षांची संख्या कमी झाली असल्याची शक्यता नाकारतां येत नाही. पालखी मार्ग हरित करणेसाठी पालखी मार्गावरील गावा मध्ये वृक्षारोपन करणेत येत आहे.

पालखी मार्गावरील ७४ गावात ही मोहिम राबविणेत येत आहे. सर्व गावात व्यापक प्रमाणात मोहिम हाती घेणेत येत आहे. दि. २४ जून ते २५ जून या कालावधीत वृक्षारोपना साठी जागा निश्चित करणेत येत आहे. दि. २५ जून ते २७ जून या कालावधीत वृक्षारोपन कार्यक्रमाचे जनजागरण करणे, दि. २७ जून ते २९ जून या कालावधीत निश्चित केलेले जागेवर वृक्षीरोपन करणे, दि. २९ जून ते २ जुलै २०२२ रोजी आवश्यक असलेली रोपे उपलब्ध करून देणे बाबत नियोजन करून देणे याबाबत चे नियोजन करणेत आले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे यांनी सर्व भारतीय वृक्ष निवडून त्याची लागवड करणेचे सुचना दिल्या. सध्या पालखी मार्गावर साफसफाई करणेचे नियोजन सुरू आहे त्या नुसार खड्डे खोदून घ्या. बचतगटांचा देखील सहभाग घ्या. शेतकरी बांधवांना विश्वासात घेऊन झांडाचे नियोजन करा. असे आवाहन केले. जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी खड्डे खेदले नंतर विविध खताचे नियोजन सांगितले.