• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माणसातला देव माणूस म्हणजे अजय पवार – सीईओ स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 26, 2023
in इतर घडामोडी
0
माणसातला देव माणूस म्हणजे अजय पवार – सीईओ स्वामी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषदेमधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार म्हणजे अधिकारी कमी पण सर्वांचे मित्र अशी ओळख झालेला माणूस. त्यांची एका महिन्यापूर्वी प्रमोशन होऊन म्हाडा मुंबईच्या वित्त नियंत्रक पदी नियुक्ती झाली. त्यांना जिल्हा परिषद सोडण्याच्या मनस्थितीत नव्हती. परंतू प्रमोशन असल्याने त्यांना जाणे भाग पडत आहे.

अखेर एका महिन्यानंतर बुधवारी त्यांच्या सत्कार आणि निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला सभागृह तुटुंब भरले होते. बसायला जागा नव्हती, बरेच कर्मचारी उभे राहून कार्यक्रम पहात होते. यावरुन अजयसिंह पवार यांच्या कार्याचा सन्मान दिसून आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

सीईओ स्वामी यांनी, खऱ्या अर्थाने माणसातला देव माणूस अजय पवार या शब्दांत वर्णन केले. मी त्यांना संताची उपमा देतो, संतांचे विचार आचरणात आणनारा माणूस आहे. अधिकारी, माणूस, डॉक्टर असे तीन प्रकार त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मला पहायला मिळाले. ते पर्यावरण प्रेमी आहेत, जिल्हा परिषदेमध्ये काम करताना मोठं सहकार्य लाभले, त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन केले.

एका महिन्यात सीईओ पदावर काम करण्याची संधी मिळाली, मार्च एंड मोठे आव्हान होते, माझ्या कामाची पद्धत फास्ट आहे पण कॅफो अजय पवार यांच्या सोबत काम करताना अडचण जाणवली नाही, एक चांगले मित्र ते झाले, अशा भावना व्यक्त करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पवार यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अर्थ विभागाला खऱ्या अर्थाने माणुसकी मिळवून देणारा अधिकारी म्हणून अजयसिंह पवार यांची ओळख जिल्हा परिषदेमध्ये राहील असे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकांदे यांनी शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना पवार म्हणाले, आयुष्यात महापुरुषांची पुस्तके वाचली, त्यांच्या काळची जाणीव मनात बाळगून त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला निरोप का देता, माझं माहेर सोलापूर आहे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काम करताना प्रामाणिकपणे करा, आयुष्यात काटकसर करा, राष्ट्र संपत्तीचा योग्य वापर करा असा सल्लाही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

जिल्हा परिषद कॅफो पदावर काम करताना अजयसिंह पवार हे झेडपीत मानाचा तुरा असल्याचे गौवोद्गार उपमुख्य कॅफो उत्तम सुर्वे यांनी काढले.पाणी व स्वच्छता विभागाचे सचिन जाधव यांना बोलताना गहिवरून आले, जाधव यांच्या दिवंगत पत्नी आजारी असताना पवार यांनी केलेले सहकार्य याची जाणीव बोलून दाखवली.नावात सिंह आहे पण कधी सिंहासारखे वागले नाहीत, आडनाव पवार असल्याने त्याला राज्यात तोड नाही अशा शब्दांत कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. असा अधिकारी कायम मनात घर करुन राहील असेही ते म्हणाले. अजयसिंह पवार यांचे ह्रुदयात स्थान कायम राहील अशी भावना व्यक्त करत विवेक लिंगराज यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या कॅफो पदाला पवार यांनी एक उंची निर्माण करुन दिली. अधिकारी पदापेक्षा चांगला माणूस म्हणून त्यांनी नाव कमावले असे गौवोद्गार शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी काढले.अजयसिंह पवार यांचे नाव सांगितले की, राज्यात कुठेही काम होते या शब्दांत गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी अजयसिंह पवार यांच्यासोबत एकत्रित काम केल्याचे अनुभव शेअर केले.कार्यकारी अभियंता खराडे, प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी यांनीही वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Next Post

उद्या मतदान बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी ,सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
उद्या मतदान बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी ,सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला

उद्या मतदान बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी ,सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026