सोलापूर : आईशी भांडू नका , असे म्हणत मुलाने वडिलांना लाकडी काठीने मारहाण केली. या मारहाणीत वडील संजय राजपूत यांच्या डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. हा घरगुती मारामारीचा प्रकार जुना विडी घरकुल आय ग्रुप येथील महेश नगर येथे घडला आहे. संजय राजपूत यांनी त्यांचा मुलगा विक्रम याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहायक फौजदार सरवदे अधिक तपास करीत आहेत.
