• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ जवळ अपघात; दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

by Yes News Marathi
January 5, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ जवळ अपघात; दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
0
SHARES
176
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावासमोर मुंबई वरून सोलापूर येथे जाणाऱ्या भरधाव कार क्रमांक MH 46 BU 5408 ने मोडनिंब वरून सिद्धेवादी येथे जात असलेल्या एका दुचाकी क्रमांक MH 13 V 6039 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी तर कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत . सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या पुरुषाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. गोरखनाथ लोंढे यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून कारमधील किरकोळ जखमी झालेल्या तीन जणांना शेटफळ येथील शासकीय रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातातील कार आणि दुचाकी वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून या अपघातात मयत झालेल्या व्यक्तींची नाव युवराज बजरंग शिंदे वय ५५ वर्षे. रा. सिद्धेवादी ता. मोहोळ जि. सोलापूर असे आहे. सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी पवार यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली.

Previous Post

पालकमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक.. आमदारांची गटबाजी मोडीत.!

Next Post

संशोधनाच्या बळावरच ‘विकसित भारत’ साकार होणार – डॉ. पी. एस. पाटील

Next Post
संशोधनाच्या बळावरच ‘विकसित भारत’ साकार होणार – डॉ. पी. एस. पाटील

संशोधनाच्या बळावरच ‘विकसित भारत’ साकार होणार - डॉ. पी. एस. पाटील

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In