येस न्युज नेटवर्क : महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पाठवण्यात आले आहे. कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यामुळे भारतातून अमेरिकेत आंब्याची निर्यात यावर्षी पुन्हा सुरू झाली आहे. या आठवड्यात वॉशिंग्टन येथील आंबा विक्री प्रदर्शनात विविध प्रकारचे आंबे असलेली पेटी थेट अध्यक्ष जो बायडन यांना पाठवली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आंबा निर्यात ठप्प होती.
रेनबो इंटरनॅशनल ही पुण्याची आंबा निर्यातदार कंपनी अमेरिकेत पाच प्रकारचे आंबे निर्यात करते. यामध्ये महाराष्ट्रातील केसर, हापूस, गोवा मानकूर, आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बांगनपाली यांचा समावेश आहे. रेनबो इंटरनॅशनलचे संचालक ए.एस. सी भोसले यांनी सांगितले. सोमवारी हा आंबा अमेरिकेला पाठवण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं.