• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

Yes News Marathi by Yes News Marathi
October 17, 2026
in मुख्य बातमी
0
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
0
SHARES
0
VIEWS

शाळेच्या ५० मीटर परिसरात जास्त साखर, मीठ व तेल असलेल्या पदार्थांच्या विक्रीस मनाई; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

सोलापूर: नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच लहान मुलांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्था, दूध संकलन केंद्रे, दूध वाहतूकदार, हॉटेल व रेस्टॉरंट चालक आणि अन्न विक्रेत्यांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार अन्नपदार्थांची गुणवत्ता राखण्याबरोबरच अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अन्न औषध प्रशासन चे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.

“दुधासाठी प्लॅस्टिक कॅन नको, स्टेनलेस स्टीलच्या कॅनचा वापर करा”
दूध वाहतुकीसाठी प्लॅस्टिकच्या कॅनचा वारंवार वापर केल्यामुळे प्लॅस्टिकमधील काही घटक दुधात मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच दूध वाहतुकीदरम्यान आवश्यक तापमान राखले गेले नाही, तर दूध खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक संस्था, दूध संकलन केंद्रे आणि दूध वाहतुकदारांनी प्लॅस्टिकच्या कॅनऐवजी स्टेनलेस स्टीलच्या कॅनचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

“तयार अन्नपदार्थांमध्ये खाद्यरंगांचा वापर टाळा”
जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, चायनीज सेंटर, बिर्याणी विक्रेते तसेच इतर तयार अन्नपदार्थ विक्रेत्यांनी ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून तयार अन्नपदार्थांमध्ये अनावश्यक खाद्यरंगांचा वापर करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियमानुसार, विशिष्ट परवानगी असलेल्या स्वीट व बेकरीजच्या अन्नपदार्थांमध्ये मर्यादित प्रमाणातच खाद्यरंग वापरण्यास परवानगी आहे. काही खाद्यपदार्थांसाठी ही मर्यादा १०० पीपीएमपर्यंत असू शकते. मात्र, संबंधित अन्नपदार्थासाठी लागू असलेले नियम आणि मानके पाळणे आवश्यक आहे.

“शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर निर्बंध”
लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार, शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात साखर, मीठ आणि तेलाचे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांच्या उत्पादन व विक्रीवर मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्या सर्व अन्न विक्रेत्यांनी या निर्देशाचे पालन करावे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी संबंधित व्यावसायिकांनी शाळेच्या परिसरात अशा खाद्यपदार्थांची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

“नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणार”
अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक जिल्हा कार्यालयामार्फत सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दूध वाहतुकीसाठी प्लॅस्टिकच्या कॅनचा वापर करणारे, तयार अन्नपदार्थांमध्ये नियमबाह्य खाद्यरंग वापरणारे हॉटेल व रेस्टॉरंट चालक, चायनीज व बिर्याणी विक्रेते तसेच शाळेच्या ५० मीटर परिसरात प्रतिबंधित खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची तपासणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही देसाई यांनी केले आहे.

Previous Post

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

Related Posts

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026