एका क्लिकवर सिएमपीद्वारे प्राथमिक शिक्षकांचा 94 कोटी पगार जमा

0
39

राज्यात वेगळा उपक्रम राबविणारी सोलापूर जिल्हा परिषद

सोलापूर – जिल्ह्यातील ९ हजार ४३३ प्राथमिक शिक्षकांना सीएमपी प्रणाली द्वारे पगार जमा होणार आहे. राज्यात शिक्षकांना वेळेत पगार देणारी सोलापूर जिल्हा परिषद अग्रणी आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात आज सीएनपी प्रणाली द्वारे प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख अशा एकुण 9433 जणांचा पगार सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते एका क्लिक वर जमा करणेत आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील,उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, लेखाधिकारी रामचंद्र पाटील, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी प्रमुख उपस्थित होते.

प्रशासकीय व तांत्रिक त्रुटी दूर करून दरमहा १ तारखेला शिक्षक व केंद्र प्रमुख यांचे वेतन थेट जिल्हा स्तरावरून त्यांचे वैयक्तीक खात्यात जमा होणे साठी अर्थ विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार व चंद्रकांत सुर्वे व त्यांचे टीम ने मेहनत घेतली. महिन्द्र कोटक बॅंकेची मदत घेऊन कमी कालावधीत युध्द पातळींवर हे काम पुर्ण केले. त्या बद्दल सिईओ दिलीप स्वामी यांनी टीम चे अभिनंदन केले. या प्रसंगी शिक्षक संघटनेचे वतीने सिईओ दिलीप स्वामी यांचा ही प्रणाली राबविणेसाठी प्रयत्न केले बद्दल सत्कार करणेत आला. प्रणाली राबविणेसाठी यशस्वी प्रयत्न केले बद्दल सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, लेखाधिकारी रामचंद्र पाटील, महिन्द्रा कोटक बॅंकेचे शाखा व्यवस्थापक ओंकार देवळे , सहाय्यक लेखाधिकारी योगेश कटकधोंड, विलास मसलकर, दिपक शेडे, यांचा सत्कार करणेत आला. शिक्षक संघटनेचे सुरेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. क्रांतीकारी निर्णय सिईओ दिलीप स्वामी यांनी घेतले बद्दल प्रशासनाचे आभार मानले. शिक्षक संघटनेचे म. ज. मोरे, एकनाथ भालेराव, राम इंगळे, महादेव जठार, विठ्ठलसिंग तोवर, शहानवाज मुल्ला, विवेक लिंगराज, सुरेश पवार यांनी सिईओ दिलीप स्वामी यांचे स्वागत केले.

शिक्षकांची परवड होणार नाही – सिईओ दिलीप स्वामी
सोलापूर जिल्हा परिषदे मध्ये १८ हजार पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी काम पाहतात. शिक्षक व मुख्यध्यापक व केंद्रप्रमुख अशा ९४३३ कर्मचारी यांना १० ते १५ दिवस पगारी साठी वाट पहावी लागायची. यामधील सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून सर्व कपात रक्कम वजा करून निव्वळ पगार शिक्षकांचे बॅंक दरमहा च्या १ तारखेला खातेवर जमा होणार आहे. शिक्षकांनी स्वच्छ सुंदर शाळा मध्ये चांगले काम केले आहे. या पुढे पगारासाठी निवेदन घेऊन कोणी येणार नाही. माझे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे पगार १ तारखेला व्हावेत यासाठी मी जाॅईन झाले नंतर सर्व खाते प्रमुख यांना पत्र दिले होते. सीएनपी द्वारे पगार देणारा सोलापूर जिल्हा हा राज्यातील दुसरा जिल्हा आहे. या पुर्वी जालना जिल्ह्याने शिक्षकांसाठी ही प्रणाली राबविली आहे. कोटक महिन्द्रा बॅंकेने चांगले सहकार्य केले.

असा होणार पगार जमा …! – शिक्षणाधिकारू लोहार
गटशिक्षणाधिकारी मुख्याध्यापक यांचे कडून आलेल्या वेतन देयकांचा पडताळणी करतील. गैरशासकीय कपाती वेगळे करतील. एकत्रीत संकलित देयक जिल्हा स्तरावर पाठवतील.
तालुका निहाय बॅंक खाते यादी व वेतन तरतुद मागणी व प्रमाणपत्र कपात विवरण पाठवतील. दर महिनेचे २० तारखेला अहवाल व संचिका शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीने तयार करतील. २५ तारखे पर्संत अर्थ विभागाकडे पाठवून त्याची पडताळणी करून दर महिनेचे एक तारखेला निव्वळ पगार शिक्षकांचे खातेवर जमा होईल. कपात रक्कम गटविकास अधिकारी यांचे खातेवर सीएनपी प्रणाली द्वारे जमा होईल. सिईओ दिलीप स्वामी यांचे पाठ पुराव्या मुळे पगार वेळेत देणे शक्य झाले आहे. मी २० वर्षे शिक्षक होतो माझा पगार १ तारखेला मिळाला नाही मात्र इतरांचा पगार १ तारखेला करता येत आहे याचा आनंद होत असल्याचे शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार यांनी सांगितले.

सीएनपी मुळे सर्व तांत्रिक त्रुटी दूर – उत्तम सुर्वे
सीएनपी प्रणाली मुळे सर्व तांत्रिक तृटी दूर झाले आहेत. या पुढे शिक्षकांना पगारीसाठी वाट पहावी लागणार नाही. सिईओ दिलीप स्वामी यांचे प्रयत्ना मुळे हे शक्य झाले आहे. टीम गेल्या एक महिनेपासून या वर काम करत आहे. कोटक महिन्द्रा बॅंकेचे चांगले योगदान मिळाले आहे असे मत उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे यांनी सांगितले.