• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 13, 2026
in Blog
0
सोलापुरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी
0
SHARES
1
VIEWS

प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘प्रिसिजन गप्पा’ या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा २० ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘दिवाळीनंतरची गप्पांची दिवाळी’ रंगणार असून, संगीत, साहित्य, सामाजिक कार्य आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांची मेजवानी सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे. हा तीन दिवसीय कार्यक्रम सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

यंदाचे हे प्रिसिजन गप्पांचे १८ वे वर्ष असून, शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक संशोधक व विचारवंत पद्मश्री डॉ. हिमतराव बावस्कर यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यंदाचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार पुणे येथील ‘थिंक क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच’च्या ‘निसर्गवारी’ प्रकल्पाला प्रदान करण्यात येणार असून, प्रकल्पाचे प्रवर्तक प्रशांत अवचट हे पुरस्कार स्वीकारतील. या पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे आहे. तसेच स्व. सुभाष राजवजी शहा स्मृती पुरस्कार चाळीसगाव येथील राजेश ठोंबरे यांना त्यांच्या सर्पमित्र आणि वन्यजीव संवर्धन कार्यासाठी दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर डॉ. हिमतराव बावस्कर यांची प्रकट मुलाखत दत्ता जोशी घेणार आहेत.

शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील अजरामर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध संगीत अभ्यासक व गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचा ‘रहे ना रहे हम’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. हिंदी सिनेसंगीताचा सखोल अभ्यास, गाण्यांच्या आठवणी आणि संगीतप्रवासाचा वेध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. त्यांना निलेश निरगुडकर, केदार परांजपे, ऋषिराज साळवी, दिगंबर मानकर आणि व्यंकटेश कुलकर्णी हे कलाकार साथसंगत करणार आहेत.अभिजित कुलकर्णी हे मृदुला दाढे यांच्याशी संवाद साधतील .

रविवार, २२ नोव्हेंबर रोजी प्रिसिजन गप्पांचा समारोप एका अविस्मरणीय संगीत कार्यक्रमाने होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या गेल्या ३० वर्षांच्या संगीतप्रवासाचा मागोवा घेणारा विशेष कार्यक्रम सादर होईल. ‘कवितेचं गाणं होताना…’ या कार्यक्रमात डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव शुभंकर कुलकर्णी आणि सन्मिता धापटे सहभागी होणार आहेत. डॉ. सलील कुलकर्णी यांची लोकप्रिय गाणी आणि संगीतनिर्मितीचा प्रवास रसिकांना अनुभवता येणार आहे.

या तीनही दिवसांचे कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून,दररोज सायंकाळी ६.२५ वाजता कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.तरी सोलापूरकर रसिकांनी या तीन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याचा मोठ्या संख्येने आनंद घ्यावा, असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले आहे.

Previous Post

टँकर खरेदी, रेबीज लस खरेदी, शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव मनपा बोर्डात… शुक्रवारी सभा

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

Related Posts

शेतकरी शांत; आता तोडणी मजूर आणि वाहनचालक आक्रमक
Blog

शेतकरी शांत; आता तोडणी मजूर आणि वाहनचालक आक्रमक

November 12, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नवा अध्याय?
Blog

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नवा अध्याय?

November 12, 2026
सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान
Blog

सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान

November 12, 2026
मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!
Blog

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026
आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर
Blog

आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर

November 5, 2026
जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
Blog

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

November 3, 2026
Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?

सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?

November 13, 2026
गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

November 13, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

सोलापूर महानगरपालिकेच्या अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाची ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवसात ५ यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

November 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026