• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 3, 2026
in Blog
0
जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
0
SHARES
0
VIEWS

जिल्ह्यात कोठेही सक्तीने कर्जवसुली होत असल्यास तात्काळ तालुका सहाय्यक निबंधकांशी संपर्क साधावा

सोलापूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खाजगी सावकारांनी शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर दिलेले होते. तरीही जिल्ह्यात खाजगी सावकारांकडून धमकी देऊन किंवा बळाचा वापर करून कर्जवसुली केली जात असल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्यावर कर्जवसुलीसाठी कोणताही अनुचित दबाव आणला जाऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मुकुंद पवार यांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये तालुका सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथकांची स्थापना केली आहे. या पथकांमध्ये सहकार विभागातील अन्य अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. खाजगी सावकारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये आणि अवैध सावकारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या पथकांमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.

सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती

अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने पंढरपूर तालुक्यातील मौजे सोनके येथे दि. २ नोव्हेंबर रोजी कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम, २०१४ मधील कलम १६ अन्वये करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान सागर जनार्दन कोळेकर, सचिन मारुती पाटील (खरात), रणजित आजिनाथ कोळेकर आणि महेश गलांडे या सोनके येथील चार रहिवाशांच्या घरांची झडती घेण्यात आली.

तक्रार करण्याचे आवाहन

जिल्ह्यात कुठेही अवैध सावकारी होत असल्याची माहिती किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी संबंधित तालुक्याच्या सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. अवैध सावकारीला बळी पडू नये तसेच सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले आहे.

Previous Post

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

Related Posts

सोलापुरातील ऊस दर आंदोलन चिघळणार?
Blog

सोलापुरातील ऊस दर आंदोलन चिघळणार?

November 1, 2026
ए आय डेटा सेंटर सारख्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल
Blog

ए आय डेटा सेंटर सारख्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल

October 31, 2026
तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा
Blog

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात
Blog

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात

October 27, 2026
इंगळगी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तरूण ठार
Blog

इंगळगी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तरूण ठार

October 27, 2026
Blog

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे यांची आता विभागीय चौकशी होणार

October 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

November 3, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

November 3, 2026
दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026