सोलापूर सह राज्यात पहाटेचा गारवा सुरू झाला आहे. अल निनोमुळे यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर पावसा वर परिणाम झाला त्यामुळे यंदा थंडी पडणार नाही असा बऱ्यापैकी तज्ञांचा अंदाज होता. मात्र गेल्या पाच ते सहा दिवसापासून ते रात्री आणि पहाटेच्या वेळी चांगलीच थंडी पडू लागली आहे. सोलापूर सह पुणे मुंबई आदी ठिकाणचा दिवसाचा पारा जवळपास 30 ते 34 अंशाच्या आसपास आहे. या बहुतांश सर्वच ठिकाणी सकाळी सहाच्या आसपास दररोज 16 ते 19 अंशाच्या आसपास तापमान खाली आले आहे.
बोचरी आणि हवीहवीशी वाटणारी थंडी सुरू झाल्याने आणि त्यातच दिवाळीचा मोसम असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटन स्थळी दाखल झाले आहेत. या थंडीमुळे ऊस, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांना चांगला फायदा होणार आहे. पहाटे तसेच सकाळी थंडगार वारे आणि दिवसभर उन्हाचे चटके असे असे वातावरण निर्माण झाले असून यामुळे आजारी पडण्याची प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.










