• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे यांची आता विभागीय चौकशी होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 24, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS

संभाजी बेनके चौकशी अधिकारी तर विजय लोखंडे सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्त

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे आदेश

भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : महापालिकेच्या नालेसफाई व रेंडीकरणाच्या कामातील कथित अनियमिततेप्रकरणी उपअभियंता सारिका गंगाराम आकुलवार आणि वरिष्ठ फोरमन गिरीश शिवकुमार पुकाळे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. सेवानिवृत्त उपसचिव सदाशिव बेनके यांची चौकशी अधिकारी तर उपअभियंता विजय लोखंडे यांची सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.


नगरसेवक जाधव यांनी महापालिका सभागृहात आणि निवेदनाद्वारे या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने यापूर्वीच तत्कालीन नगर अभियंता सारिका आकुलवार (सध्या परिवहन विभागाच्या नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत), गिरीश पुकाळे यांच्यासह कंत्राटदार रंजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि अन्य संबंधितांसह एकूण १९ जणांवर ठपका ठेवला होता. आता महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ८ नुसार विभागीय चौकशी होणार आहे. चौकशी अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


नालेसफाईच्या कंत्राटात सुमारे ८३ लाख रुपयांची तफावत आणि बिलांमधील कथित अनियमिततेचा मुद्दा जाधव यांनी उपस्थित केला होता. चौकशी टिपणीनुसार, एक्स्कॅव्हेटर लॉंग बूमसाठी प्रतितास ४ हजार ८०० रुपये, तर शॉर्ट बूमसाठी ३ हजार २०० रुपये दर मंजूर करण्यात आले. हे दर विभागीय दरसूचीच्या तुलनेत अधिक असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. कमी दर देणाऱ्या कंत्राटदारांच्या प्रस्तावांचा तुलनात्मक विचार न केल्याचाही आक्षेप आहे.कामाच्या आदेशात समावेश नसलेल्या वाहनांच्या वापराचे देयक प्रस्ताव, आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रियेपूर्वी कार्यादेश, जीपीएस यंत्रणेचा अभाव, वाहनांच्या अनुभवाची पडताळणी आणि बिल तपासणीतील त्रुटींचाही उल्लेख चौकशी टिपणीत आहे. आकुलवार यांनी रिकव्हरीसाठी सादर केलेल्या ११ बिलांमध्ये तफावत आढळल्यानंतर वसुलीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या त्रुटींमुळे महापालिकेच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचण्याची शक्यता समितीने व्यक्त केली होती. दरम्यान, भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी याप्रकरणी नियमित पाठपुरावा केल्यामुळे अखेर विभागीय चौकशी लागली आहे. याप्रकरणी प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

विभागीय चौकशी, मग निलंबन का नाही?
उलट-सुलट चर्चेला उधाण

महापालिकेत अन्य प्रकरणांमध्ये चौकशीपूर्वी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निलंबन केले जात असताना या प्रकरणात संबंधित दोघांवर निलंबनाची कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना विशेष सवलत दिली जात आहे का, वरिष्ठांचा दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप आहे का, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. विभागीय चौकशीचा निष्कर्ष आणि प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

Related Posts

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!
Blog

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

October 22, 2026
ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे “कायदेविषयक जनजागृती”
Blog

ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे “कायदेविषयक जनजागृती”

October 22, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
Blog

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा
Blog

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

October 21, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
Blog

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
Blog

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे यांची आता विभागीय चौकशी होणार

October 24, 2026
उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

October 24, 2026
तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026