• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Yes News Marathi by Yes News Marathi
October 20, 2026
in Blog
0
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
0
SHARES
0
VIEWS

१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात

२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १० लाख ६८ हजारांहून अधिक मतदार बजावणार हक्क

२७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी ; निवडणूक यंत्रणा सज्ज

मुंबई : :महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघांत २ हजार ४१९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, १० लाख ६८ हजार ७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

या पाचही मतदारसंघांतील विद्यमान सदस्यांची मुदत ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याने भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही निवडणूक घेण्यात येत आहे. मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

पाच जागांसाठी १८२ उमेदवार

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून ४१, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून ४७ आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसेच अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून २६ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ४७ उमेदवार असून, या पाचही मतदारसंघांत मिळून १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर व्यवस्था

पाचही मतदारसंघांमध्ये एकूण १० लाख ६८ हजार ७२ मतदारांची नोंद आहे. यामध्ये पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ८८ हजार १९ मतदार, तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वात कमी ३५ हजार ८१० मतदार आहेत.

मतदानासाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात ८४२, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात ७४१, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ४४५, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात ८१ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सर्व मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

६ डिसेंबरला विद्यमान सदस्यांची मुदत संपणार

विधान परिषदेच्या ज्या पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे, त्या जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी पूर्ण होत आहे. यामध्ये औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे सतीश भानुदासराव चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण गणपती लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत गोविंदराव वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण रामराव सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत दिनकर आसगावकर यांचा समावेश आहे.

Previous Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले काशीपीठाचे जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद

Next Post

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Related Posts

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
Blog

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट

October 20, 2026
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!
Blog

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश
Blog

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
Blog

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

October 16, 2026
Next Post
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026