• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऊसदरासाठी कर्नाटकातील शेतकऱ्यांचा हुबळीत एल्गार

Yes News Marathi by Yes News Marathi
September 30, 2026
in इतर घडामोडी
0
ऊसदरासाठी कर्नाटकातील शेतकऱ्यांचा हुबळीत एल्गार
0
SHARES
0
VIEWS

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन; साखरेची एमएसपी ५० रुपये, इथेनॉलचा दर ७० रुपये करण्याची मागणी

येस न्यूज मराठी नेटवर्क: ऊसाला योग्य आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत लाभदायक दर मिळावा, यासाठी कर्नाटकासह महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी संघटनांनी मंगळवारी (२९ सप्टेंबर) हुबळी येथे मोठे आंदोलन केले. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर तसेच राणी चन्नम्मा सर्कल परिसरात शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांचे नेते राजू शेट्टी आणि कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांच्यासह विविध शेतकरी नेते सहभागी झाले.

शेतकरी संघटनांनी साखरेचा किमान विक्री दर (MSP) ५० रुपये प्रतिकिलो करण्याची मागणी केली आहे. तसेच इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करून तो ७० रुपये प्रतिलिटर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांमुळे साखर उद्योगातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊन त्याचा फायदा ऊस उत्पादकांना मिळू शकतो, असा आंदोलकांचा दावा आहे.

ऊसाला ५,५०० रुपये दराचीही मागणी

कर्नाटकातील शेतकरी संघटनांनी २०२६-२७ गळीत हंगामासाठी ऊसाचा दर ५,५०० रुपये प्रतिटन निश्चित करण्याची मागणीही केली आहे. उत्पादन खर्च, मजुरी, खते, तोडणी आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन ऊसाला योग्य दर मिळावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

गळीत हंगाम लवकर सुरू करण्यास विरोध

यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या निर्णयावरही शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. लवकर गाळप सुरू झाल्यास उसाच्या वजनावर आणि साखर उताऱ्यावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, असा दावा राजू शेट्टी यांनी यापूर्वी केला होता. निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी दिल्लीला येण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

साखर दर, इथेनॉल दर, ऊसाचा भाव आणि गळीत हंगामाच्या मुद्यांवर महाराष्ट्र-कर्नाटकातील शेतकरी संघटना आता एकत्र आल्याने या आंदोलनाकडे ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

WhatsApp वापरण्यासाठी पैसे लागणार? 1 ऑक्टोबरच्या व्हायरल दाव्याचे सत्य काय?

Next Post

दुष्काळाची छाया; सांगोल्याचा जनावर बाजार फुलला!

Related Posts

दुष्काळाची छाया; सांगोल्याचा जनावर बाजार फुलला!
इतर घडामोडी

संजीव चोपडे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नवे कार्यकारी संचालक
इतर घडामोडी

संजीव चोपडे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नवे कार्यकारी संचालक

September 30, 2026
शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !
इतर घडामोडी

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

September 29, 2026
श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न
इतर घडामोडी

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!
इतर घडामोडी

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

September 29, 2026
Next Post
दुष्काळाची छाया; सांगोल्याचा जनावर बाजार फुलला!

दुष्काळाची छाया; सांगोल्याचा जनावर बाजार फुलला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळाची छाया; सांगोल्याचा जनावर बाजार फुलला!

दुष्काळाची छाया; सांगोल्याचा जनावर बाजार फुलला!

September 30, 2026
ऊसदरासाठी कर्नाटकातील शेतकऱ्यांचा हुबळीत एल्गार

ऊसदरासाठी कर्नाटकातील शेतकऱ्यांचा हुबळीत एल्गार

September 30, 2026
WhatsApp वापरण्यासाठी पैसे लागणार? 1 ऑक्टोबरच्या व्हायरल दाव्याचे सत्य काय?

WhatsApp वापरण्यासाठी पैसे लागणार? 1 ऑक्टोबरच्या व्हायरल दाव्याचे सत्य काय?

September 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026